Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

स्वच्छतेसाठी श्रमदान परळी रेल्वे ऑटो युनियनने स्वच्छता मोहीम राबवून सहभाग नोंदवला...

आपला ई पेपर 



दि2 ऑक्टोबर महात्मा गांधी  जयंतीच्या पूर्वसंध्येला परळी येथील रेल्वे स्टेशन परिसरातील स्वच्छता करून परळी रेल्वे स्टेशनचे अधिकारी व रेल्वे ऑटो युनियनच्या सर्व सदस्यांनी आज सहभाग घेतला होता.

संपूर्ण जगाला आपल्या अहिंसा, क्षमा, शांती या तत्त्वांचा संदेश देणारे महात्मा गांधी यांची जयंती, स्वच्छतेसाठी श्रमदान एक तास वतीने परळी वैजनाथ रेल्वे स्थानक या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून श्रमदान मोहिमेत सहभाग नोंदवला...

 परळी रेल्वे टेशन ऑटो युनियनअध्यक्ष बाबा शेख व त्यांचे सर्व सहकार्य यांनी आज स्वच्छता अभियानात सहभाग घेऊन रेल्वे स्टेशन परिसर स्वच्छ केला.

यावेळी  परळी रेल्वे स्टेशन रेल्वे अधिकारी स्टेशन मास्तर मीना, आरपी एफ इन्स्पेक्टर मीना, हेल्थ इन्स्पेक्टर गुप्ता व पांडे अन्य रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत अभियान सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या