Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बचपन स्कूलमध्ये Grandparents Day |आजी आजोबा दिवस उत्साहात साजरा..



आजी आजोबांचे नातवांशी असलेले घट्ट नाते मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे, प्रेरणादायी

आपला ई पेपर 

परळी येथे बचपन स्कूलमध्ये (दि.30) सप्टेंबर शनिवार रोजी आजी आजोबा दिवस (Grandparents Day) साजरा करण्यात आला. यावेळी 170 विद्यार्थ्यांचे आजी-आजोबा कार्यक्रमास उपस्थित होते. उपस्थित सर्व पालक वर्ग व आजी-आजोबांचा यावेळी स्वागत करण्यात आले.



आजी-आजोबा आणि नात किंवा नातू यांचं नातं फार विलक्षण असतं, खास असतं. आजी-आजोबा हे नातवंडांचे पहिले मित्र असतात. या नात्याची तेव्हा तिथूनच खरी जडण-घडण होत असते. म्हणून आजी आजोबांचे नातवांशी असलेल्या घट्ट नात्याची ओळख होणं आजच्या काळात महत्त्वपूर्ण असून हे नातं मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचं आणि प्रेरणादायी आहे, असे  भावउद्गार कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. प्रेमा बाहेती यांनी काढले आहेत.



सध्याची कौटुंबिक परिस्थिती पाहता आई-वडील नोकरी अथवा व्यवसायानिमित्त घराबाहेर जास्त वेळ असल्याने पाल्यांची संपूर्ण जबाबदारी आजी-आजोबांवर असते. शाळा सोडून घरातला जास्त वेळ ते आजी आजोबांसोबत घालवतात ही बाब सुद्धा महत्वपूर्ण आहे अशी माहिती बचपन स्कूलच्या प्राचार्य सौ.दीपा बाहेती दिली आहे.


राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी व सचिव बद्रीनारायण बाहेती तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सहसचिव धीरज बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.



आजी आजोबा यांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते तसेच या कार्यक्रमाच्या शेवटी झिंगाट गाण्यावर आजी आजोबा आणि नातवंडे शिक्षक या सर्वांनी मनसोक्त नृत्य करून हा आजी आजोबा हा दिवस साजरा केला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या