Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PODAR-RPLS | पोदार लर्न स्कूलमध्ये आजी आजोबांनी..पुन्हा अनुभवले बालपण

PODAR-RPLS |

PODAR-RPLS |

आजी आजोबांचे नातवांशी असलेले घट्ट नाते मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे -सचिव बद्रीनारायण बाहेती 


परळी |प्रतिनिधी


PODAR-RPLS | राजस्थानीज पोदार लर्न स्कूलमध्ये (दि.7) ऑक्टोबर शनिवार रोजी एक दिवस आजी आजोबांच्या मनोरंजनासाठी म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी 200 विद्यार्थ्यांचे आजी-आजोबा कार्यक्रमात सहभागी झाले होते. उपस्थित सर्व पालक वर्ग व आजी-आजोबांचे यावेळी शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

नेहमीच आजी-आजोबा आणि नात किंवा नातू यांचं नातं फार खास असतं. आजी-आजोबा हे नातवंडांचे पहिले मित्र असतात. या नात्याची तिथूनच खरी जडण-घडण होत असते. म्हणून आजी आजोबांचे नातवांशी असलेल्या घट्ट नात्याची ओळख होणं आजच्या काळात महत्त्वपूर्ण असून हे नातं मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचं आणि प्रेरणादायी आहे, असे भावउद्गार #PODAR-RPLS | राजस्थानी पोदार लर्न स्कूलचे सचिव या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सहभागी आजी आजोबा म्हणून बद्रीनारायण बाहेती ,सौ. प्रेमा बाहेती यांनी काढले आहेत.


सध्याची कौटुंबिक परिस्थिती पाहता आई-वडील नोकरी अथवा व्यवसायानिमित्त घराबाहेर जास्त वेळ असल्याने पाल्यांची संपूर्ण जबाबदारी आजी-आजोबांवर असते. शाळा सोडून घरातला जास्त वेळ ते आजी आजोबांसोबत घालवतात ही बाब सुद्धा महत्वपूर्ण आहे. प्रमुख अतिथी म्हणून बचपन स्कूलच्या प्राचार्या सौ.दीपा बाहेती यांनीही पालक या नात्याने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

#PODAR-RPLS | राजस्थानीज पोदार लर्न स्कूलचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी,अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंग,प्राचार्य मंगेश काशीद,उपप्राचार्य लक्ष्मण पाटीलयांच्या मार्गदर्शनाखाली या वेळी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.


प्रत्येक आजी आजोबांनी यावेळी आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत सहभाग घेतला. कारण बालपण हे प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणून आम्ही या माध्यमातून दरवर्षी शाळेमध्ये हा उपक्रम अतिशय उत्साहाने साजरा करतो. अशी माहिती शाळेचे सहसचिव धीरज बाहेती यांनी दिली आहे.






PODAR-RPLS |पोदार स्विमिंग अरेना येथे एक दिवस आजी आजोबांच्या मनोरंजनासाठी  विविध स्पर्धांचे आयोजनही यावेळी करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमाच्या शेवटी विविध गाण्यावर आजी आजोबा आणि नातवंडे शिक्षक या सर्वांनी मनसोक्तपणे नृत्य करून सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. 

 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या