Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीच्या नांदेड - बेंगलोर रेल्वेगाडी खाली आल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू

आपला ई पेपर |परळी 


आयुष्य जगण्यासाठी संघर्ष हा प्रत्येकालाच अटळ आहे. परंतु इतभर पोटासाठी अनेक जण अतिशय कठीण परिस्थितीत संघर्ष करत असतात. या संघर्षामध्ये कधीकधी चूक होते. आणि ती चूक जीवावर बेतते अशीच एक घटना परळी रेल्वे स्टेशनवर एका वडापाव  विक्रेत्या सोबत घडली आहे.

परळी रेल्वे स्टेशन मध्ये प्लॅटफार्म क्र. 3वर नांदेड - बेंगलोर रेल्वेगाडी खाली आल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. मृताचे नाव पंकज असून तो मूळ उत्तर प्रदेश येथील रहिवासी होता.

स्टेशनवर कॅन्टीनमधील समोसा, वडापाव विक्रीचे काम करत असल्याची माहिती आहे.माहिती मिळताच रेल्वे पोलीस ठाण्याचे अधिकारी,कर्मचारी, आर.पी.एफचे जवान तातडीने घटनास्थळी धावून आले.दरम्यान या घटनेचा अधिक तपास रेल्वे पोलीस करत आहेत.मृताचे नाव पंकज असून मूळ उत्तरप्रदेशचा आहे.गेल्या काही दिवसापासून तो परळी रेल्वे स्टेशन मध्ये वडापाव समोसे विक्रीचे काम करीत असल्याचे माहिती परळी रेल्वे पोलीस जमादार सय्यद यांनी दिली आहे. चालते रेल्वेमध्ये चढणे धोकादायक आहे असे वेळोवेळी सूचना करूनही अनेक जण नको ती चूक करतात आणि संपूर्ण कुटुंबाला शोकाकुल वातावरणामध्ये याचा शोक करावा लागतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या