Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Ganpati | गणेश मंडळासमोर लावलेल्या डेकोरेशनचा शॉक लागल्याने 9 वर्षीय चिमुकल्याला मृत्यू

आपला ई पेपर बीड


Ganpati सध्या गणपती आणि गौराईची आगमन सर्वत्र झाले असून या निमित्ताने अनेक ठिकाणी सजावट म्हणून विविध लाईटच्या माळा रोषणाईसाठी वेगवेगळ्या डिझाइन्स केल्या जात आहेत परंतु यावेळी सुरक्षा म्हणून कुठलेही काळजी न घेतल्यामुळे घटना घडतात असेच घटना आज बीड जिल्ह्यातील आष्टी शहरात घडली आहे मोकळ्या तारामध्ये विजेचा प्रवाह सुरू झाल्याने एक ९ वर्ष चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार

बीडच्या आष्टी शहरातील Ganpati जय भोले गणेश मंडळासमोर लावलेल्या डेकोरेशन माळेचा शॉक लागल्याने 9 वर्षीय चिमुकल्याला मृत्यू झाला. ही घटना रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली. आष्टी शहरातील संभाजीनगर येथे जय भोले गणेश मंडळासमोर लोखंडी तार लावून त्यावर लाइटच्या माळा लावल्या आहेत. याचाच शॉक लागून शिवतेज सोंडगेचा मृत्यू झाला. याप्रकरणी महादेव सोंडगे यांच्या फिर्यादीवरून मंडप मालक सुभान फकीर शेख रा. डोनगाव, ता. जामखेड याच्याविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने आष्टी शहर आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या