Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

हिंदी भाषा घरोघरी पोहचवण्याचे काम मिडिया व सिनेमाने केले प्रा. डॉ पांडुरंग चिलगर

आपला ई पेपर परळी वैजनाथ प्रतिनिधी


 हिंदी भाषा घर घर पोहचवण्याचे काम मिडिया व सिनेमाने केले. हिंदी साहित्यकांचे काम देशासाठी स्वातंत्र्य सैनिकाप्रमाणे असल्याचे प्रतिपादन डॉ पांडुरंग चिलगर यांनी केले. येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

                लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात हिंदी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (दि.२१) करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ विद्या देशपांडे, हिंदी विभागप्रमुख डॉ लक्ष्मण मुंडे, डॉ राजर्षी कल्याणकर, प्रा.प्रविण फुटके यांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ चिलगर म्हणाले की, हिंदी भाषा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हिंदी के दमपर आगे बढ सकते है.

 राष्ट्र भाषेवर श्रध्दा असणे आवश्यक पंतप्रधान नरेंद्र मोदी जगात जिथे जातात तिथे राष्ट्र भाषेत भाषण करतात. कोणतीच भाषा दुसऱ्या भाषेवर आक्रमण करत नाही. हिंदी भाषेचा प्रचार करण्याचे काम मिडिया व सिनेमाने केले असे यावेळी डॉ चिलगर यांनी मार्गदर्शनात सांगितले. प्रास्ताविक करताना डॉ लक्ष्मण मुंडे म्हणाले की, हिंदीची शब्द संपदा मोठी आहे. विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचा सखोल अभ्यास करावा, हिंदी जगात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषेत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

तर प्राचार्य डॉ देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप संजय देशमुख यांनी केला. यावेळी विद्यार्थ्यांनी हिंदी दिनानिमित्त केलेल्या भित्तिपत्रकाचे प्रकाशन व निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ राजर्षी कल्याणकर यांनी केले. आभार प्रा. फुटके यांनी मानले.कार्यक्रमास शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या