आपला ई पेपर|परळी | प्रतिनिधी
परळी शहरात मॉर्निंग वॉक ला फिरणास गेलेल्या व्यक्तीस मोटारसायकल वरून आलेल्या अज्ञात तरुणांनी चाबकाने मारहाण करीत पळ काढला. यामुळे शहरात पहाटेच्या सुमारास फिरायला जाणाऱ्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे.
परळी येथील बसस्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान रविवारी (ता.२१) पहाटे मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या व्यक्तीस मोटार सायकल वरून आलेल्या अज्ञात तरूणांनी चाबकाने मारहाण केली. ही घटना सकाळी सात सुमारास घडल्याने अनेकजणांनी मोटारसायकल वरील चाबुकधारी युवकांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु युवक पळुन जाण्यात यशस्वी झाले. अशा घटना शहरात वारंवार घडत आहेत.
परळी शहरात दोन पोलीस ठाणे आहेत. दोन्ही पोलीस ठाण्यातील कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी हा मार्ग सततच्या वर्दळीचा आहे. तरीही याच रस्त्यावर सकाळी सात वाजता चाबकाने मारहाण होण्याची घटना पोलिसांसाठी आवाहन देणारी आहे. पहाटे फिरायला जाणाऱ्यांमध्ये महिला, पुरूष व वृद्धांची संख्या मोठी आहे. पोलिसांनी कायद्याचा धाक निर्माण करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
Social Plugin