Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत दुचाकी चोरांचा वाढला सुळसुळाट|चोरी cctv कॅमेरात कैद

आपला ई पेपर |परळी |प्रतिनिधी


परळीत पोलिसांनासह नागरिकांना चोरांनी ओपन चॅलेंज केले आहे की काय ? कारण अज्ञात चोराने परळी रेल्वे स्टेशन cctv समोरून दुचाकी पळवली आहे. चोर दुचाकी चोरी करत असताना cctv कॅमेरात कैद झाले आहेत.

सध्या महिन्याभरात अनेक भागात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. परळी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात लावलेली एका दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

ही घटना दि 4 रोजी घडली आहे.परळी शहरातील रेल्वे स्टेशन येथे एक हिरो होंडा कंपनीची ही मोटरसायकल क्रमांक MH 24 N1888 अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत कसलीही माहिती मिळाली तर खालील नंबर वर संपर्क करावा पत्रकार बाबा शेख

9881417161 /8830604288

 दुचाकी चोरीच्या संदर्भात परळी संभाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत परळी पोलीस तपास करत असून या चोरांचा बंदोबस्तासाठी विशेष एक पथक नेमले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या