Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

 आपला ई पेपर परळी वैजनाथ 


प्रतिनिधी लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.


           लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख, प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे, प्रा.डॉ अरुण चव्हाण, प्रा.डॉ. राजर्षी कल्याणकर, प्रा. प्रविण फुटके यांच्या हस्ते डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर विद्यार्थिनींनी मान्यवरांसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांचे शिक्षक दिनानिमित्त पुष्पगुच्छ देवून स्वागत केले



यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.डॉ अरुण चव्हाण यांनी गुरुंना शुभेच्छा बरोबरच अभिवादन केले पाहिजे तसेच डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जिवनकार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी गुरुंचा आदर केला पाहिजे व जे कार्य करायचे आहे ते निस्वार्थीपणे केले पाहिजे. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी स्वतः चा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांचा जन्मदिवस आपण शिक्षकदिन म्हणून साजरा करत असल्याचे सांगितले. 

यावेळी प्राचार्या डॉ देशपांडे यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. तर अध्यक्षीय समारोपात संजय देशमुख यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांनी गुरुंचा कायम आदर केला पाहिजे, कोणताही गुरु लहान अथवा मोठा नसतो असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा प्रविण फुटके यांनी तर सुत्रसंचालन भाग्यश्री पांचाळ, निकीता पवार यांनी, आभार आरती डाके यांनी मानले.यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने घोषित करण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कारात महाविद्यालयातील प्रा. अशोक पवार यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख, प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या