भविष्यात हेच मुले शाळेचे नाव उज्ज्वल करतील संध्या धर्माधिकारी
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सव उत्साहात साजरा
आपला ई पेपर परळी प्रतिनिधी
दि.17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त लावण्याई पब्लिक स्कूल मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी बोलतांना माजी नगराध्यक्ष बियाणी म्हणाले की मुलांना
इंग्रजी माध्यमातून शिका पण हे शिकत असतांना आपली भारतीय संस्कृती जपली पाहिजे असे मत या वेळी बोलतांना सांगितले. दरम्यान या वेळी संध्या धर्माधिकारी यांनी मोलाचे मार्गदर्शन करून लावण्याई पब्लिक स्कुल मधील मुले भविष्यात मोठे होवुन शाळेचे नाव उज्वल करतील यात शंका नाही.
या वेळी माजी नगराध्यक्षा राधाबाई बियाणी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले या कार्यक्रमात अँड संध्या धर्माधिकारी, मुख्याध्यापक कविता विधै, पञकार संभाजी मुंडे, शितल कुलकर्णी पांडे रवींद्र पुराणिक ,शाळेचे अध्यक्ष अनंत कुलकर्णी उपस्थित होते.
या वेळी माजी नगराध्यक्षा राधाबाई बियाणी यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले की प्रत्येक पालकांना वाटते आपला मुलगा,मुलगीला इंग्रजी मधून बोलता आले पाहिजे वाचता आले पाहिजे हे ठिक आहे इंग्रजी शिकत असतांना आपली संस्कृती मुलांना विसर न पडला पाहिजे या कडे लक्ष देणे गरजेचे आहे तरच आपली संस्कृती टिकले असे मत व्यक्त केले
या नंतर अॅड संध्या धर्माधिकारी यांनी मोलाचे मार्गदर्शन करुन या लावण्याई पब्लिक स्कुल मधील मुले नक्कीच भविष्यात नाव केल्याशिवाय राहणार नाही असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुलांना योग्य भाषण केले . या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नम्रता पांडे प्रतीक्षा कुलथे यांनी केले तर आभार प्रदर्शन संघमिञा पोटभरे यांनी केले
सुषमा देशमुख यांना बेस्ट टिचर्स पुरस्काराने गौरव
दरम्यान लावणयाई पब्लिक स्कूलच्या वतिने या वर्षी पासुन शिक्षक दिना निमित बेस्ट टिचर्स हा पुरस्कार शाळेतील सहशिक्षिका सुषमा देशमुख यांना जाहीर करण्यात आला होता.आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमिताने बेस्ट टिचर्स पुरस्कारचे वितरण माजी नगराध्यक्षा राधाबाई बियाणी अँड.संध्या धर्माधिकारी,पञकार संभाजी मुंडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
Social Plugin