Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अंबाजोगाईत स्वामी रामानंद तीर्थ हैद्राबाद मुक्तीसंग्राम स्थळ भावी पिढीसाठी प्रेरणादायी -डॉ.जनार्दन वाघमारे


मुक्तीसंग्राम स्मृतीस्थळ उद्घाटन व पुस्तक प्रकाशन सोहळा

आपला ई पेपर अंबाजोगाई -


निझामी राजवटीविरुद्ध स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली योगेश्वरीतील अनेक शिक्षक तसेच स्वातंत्र्य सैनिकांनी जन आंदोलन करून मराठवाडा मुक्त केला हा संकलित इतिहास असलेले स्वामी रामानंद तीर्थ हैद्राबाद मुक्ती संग्राम स्मृतीस्थळ हे भावी पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन माजी खासदार डॉ.जनार्दन वाघमारे यांनी केले

ते मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त

योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या पू.स्वामी रामानंद तीर्थ व हैद्राबाद मुक्तीसंग्राम स्मृतीस्थळ उद्घाटन व विविध पुस्तक प्रकाशन संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी लक्ष्मणराव बोंदर,सौ. पार्वतीबाई बोंदर, श्रीमती प्रतिभाताई ठाकूर,श्रीमती महानंदा बुरांडे,डॉ.प्रभाकर देव, डॉ. प्रशांत देशमुख, योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश खुरसाळे,उपाध्यक्ष शिवाजीराव कराड, कार्यकारी उपाध्यक्ष कमलाकरराव चौसाळकर,सचिव जी.बी.व्यास, कोषाध्यक्ष एम एस लोमटे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना वाघमारे म्हणाले की योगेश्वरी शिक्षण संस्था ही स्वातंत्र्य पूर्वकाळात स्थापन झालेल्या या संस्थेचा इतिहास दैदिप्यमान आहे.स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे यांनी नंतरच्या काळात येथे येऊन मराठवाडा मुक्ती संग्रामाचे रणशिंग फुंकले आणि त्यांचे नेतृत्व उदयास आले संस्थेची राष्ट्रीय शाळा म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या प्रगल्भ असलेली होती पुढे या संस्थेचा नावलौकिक वाढला त्यावेळच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर चळवळीचे संस्कार केल्यामुळे एक आगळे वेगळे स्थान संस्थेने प्राप्त केले.

 त्या वेळचे हैदराबाद संस्थान हे इतर संस्थानाच्या तुलनेत सर्वात मोठे संस्थान होते ते अनेक कारणांसाठी भारतातील ब्रिटिश साम्राज्याची भक्कम संरक्षक तटबंदी म्हणून ओळखले जात होते ब्रिटिश राज सत्तेच्या हस्तकालीन हैदराबादची निजामी राजवट स्वातंत्र्य बहु राज्याची महत्त्वकांक्षा बाळगू लागली होती आपल्या राज्याच्या सीमाविस्ताराची आणि सादर किनाऱ्यापर्यंत पोहोचणारा भूमीमार्ग मिळवण्याची  स्वप्न पाहू लागले या सर्व गोष्टींना संस्थानातील सरंजामी प्रतिगामी शक्ती आणि रजाकार संघटने सारख्या निमलष्करी दलाचा भक्कम पाठिंबा मिळत होता.

 हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्यलढ्यात काही असाधारण वैशिष्ट्ये प्राप्त झाली या लढ्यास अनेक राजकीय खाचखळग्यातून आणि कडव्यांच्या विरोधातील जंगलातून वाटचाल करावी लागत होती अशा या असाधारण परिस्थितीत स्वामी रामानंद तीर्थ यांच्या रूपाने एक सुज्ञ खंबीर जाती निरपेक्ष असे लढाऊ नेतृत्व लाभले पुढे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली अनेक स्वातंत्र्यसैनिक लढ्यात उतरले म्हणून हैदराबाद मुक्ती संग्राम लढा आगळावेगळा लढा होता या जनतेला राजकीय,सांस्कृतिक, आर्थिक,धार्मिक, भाषिक,स्वातंत्र्य हे त्या काळात नव्हते मुक्त झाल्यानंतर ते स्वातंत्र्य मिळाले आणि आजही ते शाबूत ठेवले.असेही खा.वाघमारे म्हणाले.

यावेळी डॉ.प्रभाकर देव म्हणाले की,स्वामीजींच्या नेतृत्वा खालील मराठवाडा मुक्तिसंग्राम लढा पूर्णपणे धर्मनिरपेक्षतेच्या पायावर चालवल्या गेला कुठल्याही धर्माच्या किंवा जातीच्या नावावर तो नव्हता म्हणूनच याचे महत्त्व व सहभाग वाढला असेही त्यांनी सांगितले.

यावेळी लक्ष्मणराव बोंदर,डॉ.प्रशांत देशमुख,  यांनीही मनोगत व्यक्त केले. जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी भगवानराव देशपांडे,न.गो.राजुरकर यांनीही ऑनलाईन पद्धतीने शुभेच्छा दिल्या.  प्रास्तविकात डॉ. खुरसाळे म्हणाले की मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याचा उगम योगेश्वरी शिक्षण संस्थेत झाला या ऐतिहासिक नात्यामुळे मराठवाडा स्वातंत्र्यलढ्याचे व स्वामीजींचे स्मारक व्हावे हा संकल्प व्यक्त झाला सर्वांच्या सहकार्याने आणि सहभागाने हे स्मारक उभारल्याचे सांगितले.

 या कार्यक्रमात डॉ.वाघमारे,डॉ.देव,डॉ. देशमुख व इतरांच्या हैद्राबाद मुक्तीसंग्रामावरील पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 दीप प्रज्वलन,पू.स्वामी रामानंद तीर्थ,पू. बाबासाहेब परांजपे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार तसेच स्मृतीस्तंभास अभिवादन,दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली संस्थेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. पुस्तक परिचय डॉ. सोमनाथ रोडे,डॉ.प्रशांत देशमुख,रमेश सोनवळकर,शैलजा बरुरे यांनी करून दिला.संचालन प्रा.डॉ.गणेश पिंगळे यांनी तर उपस्थितांचे आभार यो.शि.संस्थेचे सचिव जी.बी.व्यास यांनी मानले.

या कार्यक्रमास विविध ठिकाणांहून अनेक मान्यवर,कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या