Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत शिवछत्रपती विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

आपला ई पेपर परळी


शहरातील शिवछत्रपती विद्यालयांमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला शाळेमध्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, स्वामी रामानंद तीर्थ यांची रांगोळी साकारण्यात आली तसेच त्याभोवती 75 दिवे लावून रोषणाई करण्यात आली होती. ध्वजारोहणाआधी शिवाजीनगर भागामधून विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. या प्रभात फेरीतून विद्यार्थ्यांनी मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई  श्रॉफ, सरदार वल्लभ भाई पटेल आदींच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.


 त्यानंतर विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी भाषणातून मराठवाडा स्वातंत्र्यसंग्राम विषयी माहिती भाषणे केली. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शिवछत्रपती विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक सुहास शिंदे हे उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक गोविंद मुंडे हे उपस्थित होते. गीतमंचातील विद्यार्थ्यांनी मराठवाडा गौरव गीत ,राज्यगीत ,हा देश माझा हे राष्ट्र देवतांचे इत्यादी गीतांचे सादरीकरण केले. तसेच विद्यार्थ्यांनी बाहुली नाट्यातून बालविवाह प्रतिबंध जनजागृती केली. या पपेटची निर्मिती शाळेतील शिक्षक सिद्धेश्वर इंगोले यांनी केली होती. 


बालविवाहासाठी समाजामध्ये जनजागृती व्हावी या हेतूने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून या बाहुली नाट्य विद्यालयांमध्ये सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शाळेचे मा.वि.चे मुख्याध्यापक संजय समुद्रे पाटील,हंगारे , ठाकरे ,खोखले, प्रा.वि.शिवाजी उफाडे. हीगोले,खोत पाटील,मिराबाई गिरी.सुहाशनी घोबाळे.सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते. शाळेतील शिक्षक अशोक फड यांनी  आभार प्रदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या