Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अन् शिंदे यांच्या अमरण उपोषणला पाठींबा |राजेश विभुते

परळीतील ठिय्या आंदोलनाची प्रशासनाने अद्याप पर्यंत दखल का ?घेतली नाही.

आपला ई पेपर परळी प्रतिनिधी 

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज दि २सप्टेंबर पासून तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडून बसला आहे.मराठा समाजाला मागास प्रवर्गातून शैक्षणिक व नोकरीत आरक्षण मिळावे जेणेकरून मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटक सक्षम होईल या हेतूने सुरू असलेलं ठिय्या आंदोलनाची प्रशासनाने अद्याप पर्यंत दखल घेतली नाही.

 प्रशासनाला आंदोलनाचे गांभीर्य कळावे व मराठा आरक्षणावर तोडगा निघावा यासाठी व्यंकटेश शिंदे यांनी अन्नत्याग सुरू केला आहे. राज्य प्रशासनाने मराठा आरक्षणावर तोडगा काढून व्यंकटेश शिंदे यांचे अमरण उपोषण सोडवावे अन्यथा तहसील कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा शिवसेना शहर प्रमुख राजेश विभुते यांनी प्रशासनाला दिला आहे. 


मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणासाच्या मुद्द्यावर क्रांती मैदान तहसील कार्यालय येथे आंदोलन सुरू आहे. आज शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन  व्यंकटेश शिंदे, शरद चव्हाण यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. मराठा आरक्षणाच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून काम असे लेखी पत्र देऊन मराठा आरक्षणाच्या लढ्यास पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी शिवसेना शहर प्रमुख राजेश विभुते, युवासेना उपजिल्हा प्रमुख दीपक शिंदे तालुका प्रमुख संतोष चौधरी,जेष्ठ नेते सतीश जगताप, उपशहर प्रमुख मोहन राजमाने, शहर संघटक अनिल अप्पा शिंदे, युवासेना शहर समन्वयक सुदर्शन यादव, उपशहर प्रमुख गोविंद गरड, अमोल आमले, यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या