आपला ई पेपर परळी
परळी येथे आज सकल हिंदूसमाजयांच्या वतीने हिंदू संस्कृती जोपासणाऱ्या सणासुदीला लाईट सतत बंद करण्यात येत याच्या निषेधार्थ आज परळी येथील महावितरण कार्यालयात भेटून अधिकाऱ्यांना या गोष्टीचा जाब विचारण्यात आला व निवेदन देण्यात आले आहे.
दरवर्षी हिंदू संस्कृती जोपासणाऱ्या सणासुदीला, या गौरी गणपतीसणाच्या वेळेस महावितरण लाईट बंद करून वीज ग्राहकांना त्रास देते अशी तक्रार नागरिकांची आहे. महावितरण गेल्या अनेक वर्षापासून गौरी गणपतीला लाईट बंद करून विज ग्राहकांना त्रास देते अशी तक्रार नागरिकांनी वितरण कार्यालयात केली आहे. महावितरण परंपरागत हिंदू सणाला लाईट घालून जे करत आहे ते आता करू नये व गणपती गौरी उत्सव नवरात्री व दिवाळी या सणाला सतत लाईट घालू नये.
लाईट घातल्यास भव्य असे स्वागत शाल श्रीफळ आणि गुलाल उधळून महावितरणच्या कार्यालयात सत्कार सोहळा आयोजित करण्यात येईल असे निवेदन सकल हिंदू समाज परळी वैजनाथच्या वतीने देण्यात आले आहे.
या निवेदनावर अड.अरुण पाठक, शिवशंकर मुंडे, किशनआप्पा मामडे ,अमोल काकडे ,बालाजी माने, देविदास मिरकले ,गणेश राजनाळे, शिवराज सोनटक्के ,आदिनाथ दौंड, ओमकार मिरकले, वैजनाथ फड, कृष्णा बेदरकर ,शिवशंकर जठार, तेजस्वी पल्लेवार ,ज्ञानेश्वर दराडे, अमर कळंबे ,आकाश जांभळे, सचिन गिराम, गजानन साबणे, अक्षय राऊत ,दत्तात्र यगिरी, यांच्या स्वाक्षरी आहेत
Social Plugin