Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

दैनिक मराठवाडा साथी व राधा - मोहन साथी प्रतिष्ठानच्या श्रींचे थाटात आगमन

 



कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरती; तर नवरात्रोत्सवातील भव्य सजीव देखाव्याचा पायाभरणी शुभारंभ

आपला ई पेपर परळी प्रतिनिधी

दैनिक मराठवाडा साथी व राधा - मोहन साथी प्रतिष्ठान गणेशोत्सव २०२३ अंतर्गत श्रींची आज थाटात स्थापना करण्यात आली. राज्याचे कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते पहिल्या दिवशीची पहिली आरती संपन्न झाली. तर स्थापना पूजा संपादक सतिश बियाणी व सौ. भारती बियाणी यांच्या हस्ते संपन्न झाली. याच मंगलमय प्रसंगी नाथ प्रतिष्ठान व राधा - मोहन साथी प्रतिष्ठान आयोजित दुर्गोत्सव निमित्त उभारण्यात येणाऱ्या कुलस्वामिनी माता तुळजभवानीच्या सजीव देखाव्यांच्या उभारणीचा ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा राधाबाई बियाणी, मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांच्यासह बियाणी परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.

कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेले नाथ प्रतिष्ठान व राधा - मोहन साठी प्रतिष्ठान दरवर्षी दुर्गोत्सव थाटात साजरा करण्यात येतो. यंदा आयोजित दुर्गोत्सव २०२३ मध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत माता तुळजाभवानीची हुभेहुब मूर्तीची प्रतिकृती स्थापन करण्यात येत आहे. अतिशय भव्य असा हा देखावा असणार आहे. ज्याच्या मंडप उभारणीचा आज मंगळवारी कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. ज्यामध्ये ७ बाय १२० तटबंदी किल्ल्याची प्रतिकृती असणार आहे. व त्याबरोबरच दैनंदिन पूजाअर्चा ज्याप्रमाणे तुळजापूर येथील मंदिरात होते त्याप्रमाणे सर्व पूजा इथेही दैनंदिन होतील. संबळ, पोतराज, परडी, मशालीची पोत अशा प्रकारे तुळजापूर येथील मंदिर प्रमाणे सजीव देखावा भव्य स्वरूपात उभारण्यात येणार आहे. २५ बाय ४० चा नवरात्री अखंड ज्योती कक्षाची निर्मिती करण्यात येणार असून २५१ अखंड ज्योती ९ दिवस विविध याजमनानंकडून स्थापित केल्या जातील. याच्या उभारणीचा शुभारंभ ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी  महादेव महाराज चाकरवाडीकर, जगप्रसिद्ध चित्रकार परळीचे भूमिपुत्र मुरली लाहोटी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची पहील्या दिवशी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


७००१ श्रीफळांची भव्य मूर्ती; ५१ रुपयांत प्रसाद पावती

दैनिक मराठवाडा साथी व राधा - मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आगळा वेगळा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षीच्या गणेशोत्सवात ७००१ श्रीफळ वापरून भव्य गणेश मूर्ती उभारण्यात आली आहे. मंगळवारी विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आली. ५१ रुपयांची प्रसाद पावती घेऊन या मूर्तीसाठी वापरण्यात आलेले श्रीफळ भाविकांना प्रसाद स्वरूपात प्राप्त करता येऊ शकेल, यसाठी भाविकांना शेवटच्या दिवसापर्यंत नोंदणी करता येणार आसल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या