Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

प्रभू वैद्यनाथाच्या नगरीच कृषी,शैक्षणिक व विकासाच्या दृष्टिकोनातून पडणारे मोठे पाऊल...!!



आपला ई पेपर

महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मा.ना.श्री.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या प्रयत्नातून परळी-वैजनाथ  तालुक्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत भरीव निधी मंजूर करण्यात आला.,

परळीच्या कृषी,सिंचन,पर्यटन,धार्मिक,क्रीडा या क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा व परळी तालुका या सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर व्हावा ही भूमिका परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा.ना.श्री. धनंजयजी मुंडे साहेब यांनी सातत्याने मांडली आहे. या संकल्पनेतूनच आपण परळी तालुक्यासाठी भरीव निधी खेचून आणू शकलोत.,

परळी तालुक्यामध्ये बहुतांश लोकसंख्या ही व्यवसायाने शेतीवर अवलंबून आहे. शेतीचा विकास झाला तर खऱ्या अर्थी आपल्या परिसराचा विकास होतो हे ना. मुंडे यांनी वेळोवेळी सांगितलं आहे.

महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय त्यामधे एक रुपया मध्ये पिक विमा, बोगस बियाणे फसवणुकीवर निर्बंध, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन केलेली पाहणी, कांदा प्रश्र्नी काढलेला तोडगा हे आपण सर्वांनीच पाहिलं आहे., या सकारात्मक दृष्टिकोनातूनच परळी तालुक्यासाठी

16 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांच्या अंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय,शासकीय कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय व सोयाबीन संशोधन केंद्र मंजूर केले गेले.

कृषी क्षेत्रामध्ये परळी- वैजनाथ तालुक्याचा विकास व्हावा यासाठी हे घेतलेले निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण व लाभदायक आहेत. झालेला हा निर्णय कशा पद्धतीने महत्त्वपूर्ण आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहू..

शासकीय कृषी महाविद्यालय व शासकीय कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय या दोन्हीही ठिकाणी महाराष्ट्रभरातून विद्यार्थी कृषी पदवीचा अभ्यास करण्यासाठी आगामी काळामध्ये येतील. कृषी पदवीचा अभ्यासक्रम हा 4 वर्षांचा असतो., शासकीय कृषी महाविद्यालय येथे सरासरी प्रती वर्षी 60 विद्यार्थी प्रवेश घेतील., तसेच शासकीय कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय येथे प्रतिवर्षी 60 विद्यार्थी प्रवेश घेतील., म्हणजे सरासरी प्रतिवर्षी 120 विद्यार्थी प्रवेश घेतील.,चार वर्षांची एकूण विद्यार्थी संख्या विचारात घेतली तर 480 विद्यार्थी हे महाविद्यालयांमध्ये असतील., त्यांना शिकवण्यासाठी असलेले कर्मचारी शिक्षक व इतर कर्मचारी यांची संख्या सरासरी 100 इथपर्यंत असेल, विद्यार्थी आणि महाविद्यालयाचे कर्मचारी असे एकूण 580 लोक महाविद्यालयाच्या परिसरामध्ये राहतील.. 

महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी यांना जेवण्यासाठी मेस लागेल सरासरी 500 × 2200 =11,00,000 इतकी रक्कम या विद्यार्थ्यांना लागेल. हे विद्यार्थी येथीलच परिसरामध्ये मेस लावतील यातून महिलांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक उन्नती होऊ शकेल..!

काही विद्यार्थ्यांना शासकीय हॉस्टेलमध्ये राहायचं नसेल तर खाजगी हॉस्टेलमध्ये राहावे लागेल त्यांना राहण्यासाठी खाजगी हॉस्टेल निर्माण होतील तेथे त्यांना राहण्यासाठी लागणारे पैसे यातून आपल्या तालुक्यातील लोकांना नवीन व्यवसायाची संधी उपलब्ध होऊ शकेल.

सर्व विद्यार्थी यांना नाष्ट्याची व चहा पाण्याची व्यवस्था लागेल त्यामुळे महाविद्यालयाच्या परिसरामध्ये नागरिकांनी उभा केलेल्या हॉटेल्सला ग्राहक मिळू शकतील व त्यातून ते आर्थिक उन्नती साधू शकतील. 

या सर्व विद्यार्थ्यांना स्टेशनरी साहित्य, किराणा , झेरॉक्स , सलून दुकान, प्रवासासाठी ऑटोरिक्षा, यासारख्या बाबी लागतील., मग आपल्या भागामध्ये महाविद्यालयाच्या परिसरामध्ये जे होतकरू लोक यावरील बाबी लक्षात घेत व्यवसायामध्ये उतरतील त्यांना आर्थिक उन्नती साधने शक्य होईल.. एकंदरीतच विचार केला तर महाविद्यालयामुळे परिसरातील लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, सुशिक्षितांना 100 पेक्षा अधिक पदे निर्माण होतील, यातून आपल्या भागातील लोक आर्थिक प्रगती करू शकतील, म्हणून परळीच्या आर्थिक उन्नतीसाठी शासकीय कृषी महाविद्यालयाचा व शासकीय व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचा झालेला निर्णय कौतुकास्पद आहे असे आपणास म्हणावे लागेल., परळी वैजनाथ भागासह संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते शेतकऱ्यांना नवीन बियाण्याच्या संशोधित जाती जर उपलब्ध झाल्या तर शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान वापरून जास्तीत जास्त उत्पादन आपल्या शेतीमध्ये घेऊ शकतील, ही बाब लक्षात घेता सोयाबीन संशोधन केंद्र परळी तालुक्यामध्ये होणे म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आधुनिक शेतीच्या बाबतीत टाकलेलं हे खूप मोठं पाऊल आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. या संशोधन व प्रशिक्षण केंद्राचा फायदा परळीसह संपूर्ण बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होईल, म्हणून हा निर्णय झालेला शेतकऱ्यांच्या हितासह संपूर्ण तालुक्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे.

परळी तालुक्यातील सिंचनाच्या दृष्टिकोनातून खो.सावरगाव, गोवर्धन तांडा, कन्हेरवाडी, वाका, मांडवा (परळी), पाडोळी, सारडगाव, दौनापूर,करेवाडी, लेंडेवाडी,दौंडवाडी, अस्वलआंबा, मेंदवाडी या गावांमधील  13 साठवण तलावांना मान्यता देण्यात आली यामुळे परिसरातील सिंचनाचा प्रश्न सोडवणे सोयीचे होणार आहे यातून शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल आणि शेतकरी आपल्या शेतीची उत्पादक क्षमता वाढवू शकतील..

ज्योतिर्लिंग असलेलं प्रभु वैद्यनाथाचं मंदिर देशभरातील अनेक राज्यांमधून लोक हे श्री.वैद्यनाथांचे दर्शन घेण्यासाठी परळी मध्ये येत असतात या येणाऱ्या लोकांची राहण्याची व्यवस्था व्हावी व मंदिराचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून श्री.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या प्रयत्नातून परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकासाच्या सुधारित 286. 68 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. यामुळे मंदिर व मंदिर परिसराचा विकास मोठ्या प्रमाणावर होणार आहे. यामुळे धार्मिक पर्यटन आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात होईल व तेथे असलेल्या व्यावसायिकांना याचा लाभ होऊन आर्थिक 

प्रगती ते साधू शकतील..

परळी बस स्थानकाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता अनेक दिवसांची ही मागणी लक्षात घेता बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी 28 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला.,

हे सर्व निर्णय परळी तालुक्याच्या  दृष्टिकोनातून सर्व नागरिकांच्या हिताचे व आर्थिक दृष्ट्या परळीतील व्यवसाय वाढवणारे, परळी तालुक्याला प्रगतीपथावर घेऊन जाणारे आहेत. त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या हिताचे आहेत. एखाद्या भागाचा झालेला विकास हा व्यवसायाला व रोजगाराला संधी उपलब्ध करून देत असतो,आणि यातूनच खऱ्या अर्थी सर्वांगीण प्रगती होत असते, या सर्व बाबी लक्षात घेता छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेले निर्णय हे परळीच्या कृषी, सिंचन, शैक्षणिक,धार्मिक , आर्थिक,पर्यटन या क्षेत्राला नवीन उभारी शाश्वत व समृद्ध दिशा देणारे ठरतील हा विश्वास वाटतो.

महेश रामराव मुंडे(कृषी पदवीधारक)

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी.,

रा.जिरेवाडी ता.परळी वैजनाथ जि.बीड.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या