Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

कोणताच विद्यार्थी हा ढ नसतो त्याचा बुध्यांक कमी जास्त आसू शकतो शिक्षकांची भूमिका महत्त्वाची |दीपाताई मुधोळ-मुंडे


शिक्षक व साहित्यिकच सुसंस्कृत समाज घडवू शकतात-राजकुमार कदम

------------------------------------


मसापच्या पुरस्काराचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते थाटात वितरण संपन्न

------------------------------------ 

 आपला ई पेपर परळी| प्रतिनिधी

कोणताच विद्यार्थी हा ढ नसतो त्याचा बुध्यांक कमी जास्त आसू शकतो अशा प्रत्येक विद्यार्थ्यांना घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची आसून ती त्यांनी चोकपणे पार पाडली पाहिजे असे प्रतिपादन जिल्ह्याच्या कार्यकुशल व कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ-मुंडे यांनी केले तर सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी शिक्षक व साहित्यिक यांची महत्वाची भूमिका आसल्याचे प्रतिपादन शिक्षक नेते तथा साहित्यिक राजकुमार कदम यांनी केले.

येथील मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त घोषित करण्यात आलेले पंधरा आदर्श शिक्षक, दोन साहित्य गौरव व दोन सेवा गौरव पुरस्काराचे वितरण जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दिपाताई मुधोळ-मुंडे यांच्या शुभहस्ते येथील वैद्यनाथ औद्योगिक वसाहतीच्या सभागृहात थाटात संपन्न झाले. 

यावेळी बोलताना त्यांनी वरील प्रमाणे प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर मसापचे तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक तथा मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम, गटशिक्षणाधिकारी श्रीराम कणाके, तहसीलदार गणेश पेदेवाड,नायब तहसीलदार बाबुराव रूपनर, शिक्षक नेते पी.एस.घाडगे, माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, बदलत्या शिक्षण व्यवस्थेसी एकरूप होवून व्यवस्थेला पुढे घेऊन जाण्याची भुमिका शिक्षकांनी पार पाडली पाहिजे व ती शिक्षकच पार पाडू शकतात अशी महत्त्व पुर्ण भुमिका त्यांनी मांडली.

यावेळी कदम सर बोलताना म्हणाले की,समाज व्यवस्थेत शिक्षक व साहित्यिक यांची भूमिका फार महत्त्वाची आसून साहित्यिक हा लेखनीच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न ऐरणीवर आणत आसतो तर शिक्षक हा सुसंस्कृत समाज घडवण्याचे काम करत आसतो.अशा गुणी शिक्षक व साहित्यिकांचा सन्मान येथील मराठवाडा साहित्य परिषद करते हि कौतुकास्पद बाब आसल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी शाहीर अनंत मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामावरील कार्याचा गुणगौरव आसलेला पोवाडा सादर केला. त्यांच्या पोवाड्यांने जिल्हाधिकारी व श्रोते मंत्रमुग्ध झाले. स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी रसिक श्रोत्यांमध्ये बसून पोवाडा ऐकला

कार्यक्रमाचे प्रस्ताविक मसापचे सचिव प्रा.राजकुमार यल्लावाड यांनी केले तर सुत्रसंचालन कार्याध्यक्ष अनंत मुंडे व बालाजी कांबळे यांनी तर आभार बंडू अघाव यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मसापचे उपाध्यक्ष अरुण पवार, कोषाध्यक्ष प्रा.संजय अघाव, दिवाकर जोशी, सिध्देश्वर इंगोले,गणपत गणगोपलवाड, चंद्रशेखर फुटके, सुनिता कोमावार, चेतना गौरशेटे परिश्रम घेतले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या