Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत व्यायामाची बंद असलेली उपकरणे सुरू करा नागरिकांची मागणी...

 


आपला ई पेपर

परळी |प्रतिनिधी वैद्यनाथ कॉलेज मध्ये व्यायाम करण्यासाठी असलेली उपकरणे गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. बंद असलेली उपकरणे सुरू करण्याची मागणी जेष्ठ नागरिकांनी केली आहे.

परळी येथील वैद्यनाथ महाविद्यालयात विद्यार्थी व जेष्ठ नागरीकांच्या सोयीसाठी व्यायाम करण्याची वेगवेगळी उपकरणे बसविण्यात आली होती. त्याचा जेष्ठ नागरिक वापर करीत होते. परळी शहरात व्यायाम करण्याची उपकरणे मोकळ्या जागेत नसल्याने अनेकजण सकाळी व संध्याकाळी वैद्यनाथ कॉलेज मध्ये जाऊन व्यायाम करीत होते. परंतु मागील काही महिन्यांपासून व्यायाम करण्याची उपकरणे बंद पडलेली आहेत. त्यामुळे अनेकांना त्यांच्यावर व्यायाम करता येत नाही. वैद्यनाथ महाविद्यालयातील बंद असलेली व्यायाम करण्याची साधने तात्काळ दुरूस्त करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या