Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बीडच्या सायबर पोलिसांनीचे कौतुकास्पद कारवाई.... अन आरोपी जाळ्यात गावला


अंबाजोगाईच्या व्यापाऱ्याला सव्वा लाखाला गंडा घालणाऱ्या टाेळीचा म्हाेरक्या पोलिसांच्या जाळ्यात

आपला ई पेपर परळी

अंबाजोगाईच्या व्यापाऱ्याला सव्वा लाखाला गंडा घालणाऱ्या टाेळीचा म्हाेरक्या पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.अगोदर अटक असलेल्या तीन आरोपींनी आपले नाव घेऊ नये, यासाठी काही करता येते का? यासोबतच गुन्ह्याचा हालहवाला घेण्यासाठी तो बीडला आला. ही माहिती मिळताच त्याला शिताफीने बेड्या ठोकल्या. ही कारवाई सायबर पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा बीड शहरात केली.हिमांशु कुमार सिंह (वय २५, रा. बिहार) असे आरोपीचे नाव आहे. 

त्याने अंबाजोगाईतील एका व्यापाऱ्याचे ऑनलाइन सव्वा लाख रुपये लुटले होते. यासाठी त्याने जम्मू काश्मीरमधील पंकज मेहरा आणि करण कुमार यांचे बँक खाते किरायाने घेतले होते. रामरंजन कुमार या मावसभावाची यासाठी मदत घेतली. बीडमध्ये गुन्हा दाखल होताच सायबर पाेलिसांचे पथक मागील आठवड्यात जम्मूला पोहाेचले. त्यांनी या तिघांना बेड्या ठोकून बीडला आणले. त्यांच्याकडून हिमांशू हा खरा म्होरक्या असल्याचे समजले. तेव्हापासून पोलिस त्याचा शोध घेत होते.

अशातच तो गुरुवारी बीडमध्ये आल्याची माहिती सायबर पोलिसांनी मिळाली; परंतु, तो एकाजागेवर न थांबता सैरभर फिरत होता. त्यामुळे त्याला शोधताना पोलिसांना कसरत करावी लागली. अखेर गुरुवारी रात्री आठ वाजता त्याला शिताफीने पकडण्यात पोलिसांना यश आले. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर,अपर अधीक्षक सचिन पांडकर,पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भरत काळे, उपनिरीक्षक शैलेष जोगदंड, निशीगंधा खुळे, आशिष वडमारे, अन्वर शेख, अनिल डोंगरे, प्रदीप वायभट, विजय घोडके, अजय जाधव, गणेश घोलप, भारत जायभाये आदींनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या