Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

निधन | गणेश रामकिशनराव दहिभाते यांचे अल्पशा आजाराने निधन; रविवारी सकाळी अंत्यसंस्कार

 


परळी वैजनाथ दि.30 येथील तुकारामनगर (वडसावित्री) भागातील प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर रामकिशनराव दहिभाते यांचे ज्येष्ठ चिरंजीव गणेश दहिभाते (वय 35) यांचे पुणे येथे खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी (दि.30) सायंकाळी पाचच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.

गेल्या दोन दिवसांपासून गणेश दहिभाते याच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रूग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. गणेश दहिभाते याच्या पश्चात आजी, आई, वडील, चुलता, चुलती, पत्नी, दोन भाऊ, दोन बहिणी, दोन मुलगे असा मोठा परिवार आहे. रविवारी (दि.01) सकाळी 9 वाजता गणेश दहिभाते यांच्यावर परळी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गणेश दहिभाते यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात (एम.टेक.) मोटार मॅकेनिकल  या विषयात पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण केले होते. गणेश दहिभाते सध्या पुणे येथे टाटा मोटार्स कंपनीत कार्यरत होते. त्यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. दहिभाते कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या दुःखातून सावरण्याची प्रभू त्यांना शक्ती देवो, ही प्रार्थना.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या