Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PODAR-RPLS |पोदार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राबविले स्वच्छता अभियान

परळीत विविध भागात स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना हीच “स्वच्छांजली” आणि श्रद्धांजली वाहण्यात आली..


परळी| प्रतिनिधी |PODAR-RPLS


एक तारीख,एक घंटा, एक साथ.. स्वच्छता ही सेवा अभियानात PODAR-RPLS |राजस्थानी पोदार शाळेतील सर्व प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सामील होऊन आज (दि.30)सप्टेंबर रोजी परळी परिसरातील रेल्वे स्टेशन वैद्यनाथ मंदिर, परळी बस स्थानक  अशा विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.



शासनाच्या नियमानुसार दि.16 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 2 ऑक्टोबर जयंती पर्यंत संपूर्ण भारतात सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे या अनुषंगाने शाळेतील शिक्षक कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी जाऊन त्या परिसरातील स्वच्छता करत हे स्वच्छता अभियान राबविले आहे.


 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंती निमित्तानं आज( दि.30) सप्टेंबर रोजी परळी परिसरात एकाच वेळी विविध भागात शाळेतील PODAR-RPLS |सर्व विद्यार्थ्यांनी एक आगळावेगळा भव्य उपक्रम राबवित  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना हीच “स्वच्छांजली” आणि श्रद्धांजली वाहण्यात आली.


 PODAR-RPLS |राजस्थानीज पोदार शाळेचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी यांच्या संकल्पनेतून तर सचीव बद्रीनारायण बाहेती,उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी, सहसचिव धीरज बाहेती,अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंग,प्राचार्य मंगेश काशीद,उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला.

 आज (दि 30) सप्टेंबर रोजी परळी परिसरातील विविध ठिकाणी हे स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. अशी माहिती शाळेचे सहसचिव धीरज बाहेती यांनी दिली आहे.

 हे स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी PODAR-RPLS | शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.


Video 

*RPLS |राजस्थानीज पोदार स्कूलमध्ये उत्कृष्ट असा अप्रतिम आकर्षक देखावा*

*इको फ्रेंडली श्री गणेशाची स्थापना..*

*12 ज्योतिर्लिंगांपैकी एक हिमालय पर्वतामध्ये हे उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिर*.  👇👇👇
*https://youtube.com/shorts/wjcT66D6rUs?si=kGoRlwWnaDraC8sb*

*हेडलाईन्स*
*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*

👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*
*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या