Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

ईद ए मिलादुन्नबी निमित्त मिरवणूक ईद-ए-मिलाद म्हणजे माणुसकीचा संदेश

आपला ई पेपर परळी


ईद-ए-मिलाद म्हणजे जगात शांती त्यागाचा आणि माणुसकीचा संदेश देणारे मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस.या निमित्त शहरातील मौलाना आझाद चौक मलीकपुरा भागातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.


यंदा अनंत चतुर्दशी आणि पैगंबर जयंती (ईद-ए-मिलाद) एकाच दिवशी म्हणजे २८ सप्टेंबर रोजी होती. या दिवशी मोठ्या उत्साहात मिरवणूक (जुलूस) काढतात. गणेशोत्सव काळात शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यावर अनेक ठिकाणी मंडळाचे मंडप असतात. शिवाय गणपतीच्या मिरवणुका सकाळपासून त्याच मार्गाने असतात. त्यामुळे मुस्लिम समाजातील परळी शहर जुलूस समितीने हा निर्णय घेण्यात आला होता की या वर्षी २८ सप्टेंबर ऐवजी ३० सप्टेंबर रोजी मिरवणूक काढण्याचा निर्णय जाहीर केला होता


 

जगभरातील मुस्लिम बांधवांचा पवित्र ईद-ए-मिलादुन्नबी हा सण व हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.ईद-ए-मिलाद म्हणजे हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस.यानिमित्त शहरातील मशिदीवर , मोहल्यात गेल्या आठवड्यापासून भव्य रोषणाई करण्यात आली होती.  याठिकाणी पवित्र धार्मिक ग्रंथाचे पठण करून ईदनिमित्त पवित्र पर्व काळात पहाटे पाच ते रात्री दहापर्यंत मुस्लिम भाविक मोठ्या संख्येने बयान ऐकण्यासाठी गर्दी करतात.दरम्यान ईद निमित्त गोड भात,बुंदीचे लाडू प्रसाद म्हणून वाटप केला जातो.आज जयंतीनिमित्त शनिवारी मुस्लिम बांधवांनी भव्य अशी मिरवणूक काढून धार्मिक झेंडे फडकावत उत्साहात घोषणाबाजी करण्यात आली.

शेवटी पोलीस प्रशासनाकडून झालेल्या सहकार्याबद्दल परळी शहर व संभाजीनगर पोलीस व त्यांच्या सहकार्यांचे अहेले सुन्नत जमात व कमेटीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. दरम्यान इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस अहेल सुन्नत जमात व तमाम मुस्लीम समाज बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात व भव्य दिव्य मिरवणूक काढून साजरा करण्यात आला. या मिरवणूकीत शहरातील तमाम मुस्लीम बांधव मोठ्या संख्यने सहभागी झाल्याने ही मिरवणूक न भुतो न भविष्यती अशीच झाली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या