Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

स्पेशल | परळीत खवय्यांसाठी ४० नमुन्यांचे दोसे एकाहून एक स्वादिष्ट आणि रुचकर ..

 


इंजिनिअरिंग सोडून कृष्णा दिलीप बद्दर यांनी थाटला व्यवसाय

आपला ई पेपर परळी वैजनाथ

 सध्याच्या युगात इंजिनिअरिंग किंवा कोणत्याही प्रकारची हातात डिग्री पडली की तरुणांपुढे एकच प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे आता नोकरी कुठे लागणार हा गंभीर प्रश्न सोबत घेऊन तो बेरोजगारीत कसे बसे आपले दिवस काढीत असतो नेमकी हीच सल परळीचे युवा उद्योजक कृष्णा दिलीप बद्दर यांनी ओळखली व कॉम्प्युटर डिप्लोमा शिकत असतानाच मध्येच सोडून व्यवसायाकडे जाण्याचा निर्णय घेतला व आज स्पेशल |परळीत 'चटपटा दोसा सेंटर' च्या माध्यमातून आपला व्यवसाय थाटला व त्यात ते यशस्वी झाले.

स्पेशल | परळी शहरात बस स्थानक शेजारी राज्य रस्त्यावर प्रसिद्ध असलेल्या साई प्रेम पॅलेस येथे पहिल्या मजल्यावर क्रष्णा दिलीप बद्दर यांनी 'चटपटा दोसा अँड नाश्ता सेंटर' थाटले असून खवय्यांसाठी एक लज्जतदार मेजवानीच ठरत आहे.

 आपले इंजिनिअरिंग शैक्षणिक मध्येच सोडून व्यवसाय करण्याच्या उद्देशाने विविध प्रकारचे दोसे आणि नाश्ता शिकण्यासाठी क्रष्णा बद्दर हे हैदराबादला गेले त्या ठिकाणी दोन वर्ष प्रशिक्षण घेऊन वर्षापूर्वी त्यांनी हिंगोली या ठिकाणी व्यवसाय थाटला. हिंगोली या ठिकाणी एक वर्ष यशस्वी व्यवसाय करीत त्यांनी आपला व्यवसाय परळी कडे वळवला. परळीत व्यवसाय थाटुन ते यशस्वी वाटचाल करीत आहेत. मुंबई, पुणे, हैदराबाद आदी मोठ मोठ्या शहरात मिळतात त्यापेक्षाही तोडीचे दोसे म्हणजे बटर मसाला दोसा, बटर चीज दोसा, पावभाजी दोसा, पाणीपुरी दोसा, कोथिंबीर चीज दोसा, कोथिंबीर मायोनीज चीज दोसा, तुपाचा मसाला दोसा, चीज मायोनीज दोसा, पालक पनीर दोसा, पिझ्झा दोसा, दिलखुश दोसा, पहाडी दोसा, ४ फुटी जम्बो दोसा अशा प्रकारच्या चाळीस नमुन्यांचे दोसे बरोबरच खवय्यांसाठी चविष्ट इडली सांबर, फ्राय इडली सांबर, वडा सांबर, स्पेशल वडा सांबर, उत्तप्पा, बटर उत्तप्पा, चीज बटर उत्तप्पा अशा विविध प्रकारच्या नाश्त्याची सोय कृष्णा बद्दर यांनी आपल्या चटपटा दोसा आणि नाश्ता सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे जे की ग्राहकांसाठी एक प्रकारचे आकर्षण ठरत आहेत. आजतागायत खवय्यांनी कुठेच घेतली नसेल इतकी चवदार नाष्ट्याची सोय झाल्याने या ठिकाणी मोठ्या गर्दीने खवय्ये लाभ घेत आहेत. 

खवय्यांची गर्दी पाहता सुट्ट्यांच्या दिवशी तर जवळपास अर्धा ते एक तास त्यांना वाट पहावी लागते अशी परिस्थिती आहे. प्रशस्त आणि आकर्षक बैठक व्यवस्था असलेल्या ह्या सेंटरमध्ये फॅमिली आणि किट्टी पार्टीसाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. सदर व्यवसायापासून आपण समाधानी असून ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा कशी देता येईल याकडे आपले विशेष लक्ष असते अशी प्रतिक्रिया तरुण उद्योजक कृष्णा दिलीप बद्दर यांनी व्यक्त केली.

    "स्वादिष्ट दाळ बाटीही उपलब्ध"

कृष्णा दिलीप बद्दर यांनी‌ चटपटा दोसा आणि नाश्ता सेंटर बरोबरच स्वादिष्ट राईस प्लेट आणि दाळ बाटी ची सोय देखील ग्राहकांसाठी नव्याने उपलब्ध करून दिली आहे ज्याचा की अनेक‌ ग्राहक लाभ घेत आहेत.

परळी शहरात दाळ बाटी मिळणारे हे एकमेव स्थान आहे. "एकदा या आग्रह आमचा नंतर स्वतः याल ही खात्री आमची" ह्या ब्रीद वाक्य सोबत हे सेंटर यशस्वी वाटचाल करतांना दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या