Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

महाराष्ट्र विद्यालय संकुलात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सव उत्साहात साजरा

 आपला ई पेपर |परळी | प्रतिनिधी


महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित महाराष्ट्र विद्यालय संकुलात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या मंगलमय दिनी महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक सुदामदादा देशमुख यांच्या शुभहस्ते तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण संपन्न झाले.

17 सप्टेंबर 2023 हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षा म्हणुन संपूर्ण मराठवाड्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येते असुन याच अनुषंगाने महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित महाराष्ट्र प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहा येथे सकाळी 8:10 वा तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण संपन्न झाले.ध्वजारोहण पूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावात रॅली काढून मराठवाडा मुक्ती दिन चिरायू होवो अशा गगन भेदी घोषणा दिल्या. ध्वजारोहण संपन्न झाल्यावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर समूह नृत्य सादरीकरण केले.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सव दिनानिमित्त संपन्न झालेल्या या ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव एड.अजय बुरांडे, संचालक सुदाम शिंदे,सखाराम शिंदे, प्राचार्य धनंजय देशमुख, उपमुख्याध्यापक विनायक राजमाने, पर्यवेक्षक मुरलीधर बोराडे यांच्यासह गावातील सर्व शासकीय,नीम शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, ग्राम पंचायतीचे आजी-माजी सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, युवक, पालक, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगद पेड्डेवाड, प्रास्ताविक मुकुंद चौधरी तर आभार व्यक्त विनायक राजमाने यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या