Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

स्केटिंग स्पर्धेत नेत्रदिपक यश या यशस्वी खेळाडूच्या कामगिरीचे सर्वत्र अभिनंदन

 आपला ई पेपर | संभाजीनगर


क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय औरंगाबाद व सेलर रिले स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आयोजितमराठवाडा मुक्तिसंग्राम दिना निमित्त राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा 2023 प्रायोजक अरोरा कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने संभाजीनगर येथील मैदानावर या स्पर्धा आयोजित केल्या होत्या 

 या स्पर्धेत राजस्थानी पोदार लर्न स्कूल येथील दहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यात दोन दलाने स्केटिंग स्पर्धेसाठी विजेते पारितोषिक मिळविले  आहे, आज दि 18 रोजी शाळेत त्यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले करण्यात आले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आला यावेळी 

गुणवंत खेळाडूंचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी, सचीव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी, सहसचिव धीरज बाहेती,अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग,प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांनी अभिनंदन केले. तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत

या यशस्वी खेळाडूच्या नेत्रदिपक कामगिरीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तसेच मार्गदर्शक क्रिडाशिक्षक सूर्यकांत घोलप यांचे ही राजस्थानीज पोदार लर्न स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पालक आदींनी अभिनंदन केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या