Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अत्यंत दुर्दैवी घटना....महाविद्यालच्या श्री गणेश आगमनच्या मिरवणूक दरम्यान घडली आहे

 अत्यंत दुर्दैवी घटना....


Video केवळ जनजागृतीसाठी हा व्हिडिओ


आपला ई पेपर बुलढाणा येथील रहिवासी मुख्याध्यापक विवेकानंद विद्यालय भगवान सावळे यांचा मुलगा सोहम सावळे यांचे कटक ओरिसा येथे मिरवणुकी दरम्यान महाविद्यालच्या श्री गणेश आगमनच्या मिरवणूक दरम्यान शिवमच्या हातातील झेंड्याचा स्टील रोड रस्त्यावरील विजेच्या ताराला स्पर्श झाल्यामुळे दुर्दैवी घटना घडली आहे.

विवेकानंद विद्यालय सव येथून नुकतेच सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक सावळे सर यांचा मुलगा सोहम ओरिसा मध्ये शिक्षणासाठी गेलेला होता व त्यासोबत अजून महाराष्ट्रातील काही विद्यार्थी होते. कॉलेजच्या  गणेशोत्सवाची मिरवणूक सुरु असताना शिवमच्या हातात झेंड्याचा स्टीलचा रॉड होता. त्या रॉडचा विजेच्या तारांना स्पर्श झाला आणि क्षणात सोहमसह या गाडीमधील 4 विद्यार्थ्यांना जबरदस्त विजेचा तीव्र धक्का शॉक बसला व यामध्ये हे पाचही विद्यार्थ्यांनी जगाचा निरोप घेतला...

मिरवणुकीच्या घटनांमध्ये गणेशोत्सव साजरा करताना कृपया सर्वांनी काळजीपूर्वक सावध रहावे. एखाद्या घडणार्‍या वाईट घटनेपासून कोणी देव नव्हे तर आपला सदसद विवेक आपणास तारुन नेईल यावर ठाम असणे गरजेचे आहे. सदरील घटनेत यांच्या परिवारावर  शोककळा पसरली असून गावातही गणेशोत्सव दरम्यान सगळं हळहळ व्यक्त होत आहे अशा घटनांची काळजी घेणे सध्या खूप महत्त्वाचे आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या