Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मानवी हदयात धैर्य पेरणार गुरूजी असतो |प्रा.डॉ.माधव रोडे

 आपला ई पेपर |सिरसाळा

येथे श्री पंडितगुरू पार्डीकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शिक्षक दिन निमित्ताने प्रा.डॉ.माधव रोडे


यांच्या व्याख्यांनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . त्यावेळी कार्यक्रमाच्या विशेष उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष मा.व्यंकटराव कदम तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ के.के.पाटील होते, प्रा.डॉ.के.एम.नागरगोजे, प्रा.दयानंद झुंजुर्डे, प्रा वाळके मॅडम उपस्थितीत होते.या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन करून झाली.यावेळी शिक्षक व विद्यार्थीना मार्गदर्शन करताना डॉ.माधव रोडे म्हणाले
,विद्यार्थी चांगल्या ज्ञानाशिवाय आपली शक्ती वापरू शकत नाहीत , म्हणुन युवकांनी ज्ञान मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करावे.


त्यासाठी गुरूजी लागतात, मानवी हदयात धैर्य पेरणारी व्यक्ती खरी चिकित्सक असते. सकारात्मक प्रेरणे धैर्य भरलेला युवकाच जगबदलण्याची क्षमता असते. एकच ध्येय घेत तमाम मनुष्यजात जगत असते, ते ध्येय म्हणजे शोध सुखाचा.


यावेळी मला महात्मा फुले यांच्या हया ओळी आठवतात...

सत्या सर्वांचे आदी | सर्व धर्मांचे माहेंर ॥

सत्य सुखाला आधार | बाकी सारा अंधकार ॥


विद्यार्थी मित्रानों विवंचनेच्या भोवऱ्यात अडकलेल्या माणसाला बाहेर पडण्यासाठी शिक्षक आवश्यक असतो, म्हणुन शिक्षकचा सन्मान केला जातो शिक्षक आपल्या शिष्यांना फक्त कागदी परीक्षेसाठीच नव्हे, तर जीवनातील प्रत्येक परीक्षेसाठी तयार करत असतो, शाळेच्या खिडकीबाहेरचे जग दाखवणारे आणि माणुसकीचे धडे गिरवायला, माणसे वाचायला, माणुसकी जपायला शिकवणारा खरा शिक्षक अस मी मानतो 

एका लक्षात ठेवा अडथळा सिध्दीसाठीचे प्रोत्साहन असतो. 


प्रा.रोडे म्हणाले मला त्यापुढे जाऊन असे म्हणायचे आहे की,  विद्यार्थींचा उत्साह कमी न करता  आयुष्याबाबत त्याला निराश न करता त्याचे मार्गदर्शन करण्यात शिक्षक महत्वाची भुमिका पाडू शकतो, विद्यार्थींची शिकण्याची क्षमता शिकणे , त्यात आवड निर्माण करणे ही शिक्षकाची भुमिका असावी, समज विकसित क्रण्यासाठी गैरसमज कमी करायला हवेत याची जाणीव विद्यार्थीना करू देणे गरजेचे आहे असे प्रा,डॉ.माधव रोडे म्हणाले . 

कार्यक्रमाचे आयोजन एनएसएसच्या कार्यक्रधिकारी प्रा के एम.नागरगोजे यांनी करले.तर सुत्रसंचलन जयदिप सौंळके, आभार कार्यक्रमधिकारी प्रा.दयानंद झुंजुर्डे यांनी मांडले, कार्यकमात विद्यार्थी मोठ्या संख्याने सहभाग नोंदवला .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या