Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत गाढे पिंपळगाव फाट्यावर चक्काजाम

 आपला ई पेपर|परळी वैजनाथ |प्रतिनिधी


 जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटा येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आणखी धार देण्यासाठी व प्रशासनाकडून करण्यात आलेल्या अमानुष लाठीचार्ज मधील पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा या व अन्य मागण्यांसाठी संपूर्ण जिल्ह्यात गुरुवारी (ता.०७) चक्काजाम आंदोलन करण्यात आले. याचाच एकभाग म्हणून तालुक्यातील गाढे पिंपळगाव फाट्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.               

जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा, मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या या व मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. याचाच एकभाग म्हणून परळी-बीड राष्ट्रीय महामार्गावरील गाढे पिंपळगाव फाट्यावर मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी १० पासून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मारला. 

रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी जवळपास एक-एक किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. आरक्षण आमच्या हक्काचे, देत कसे नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, आंतरवली सराटा येथे प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या लाठीचार्जचा जाहीर निषेध करत गृहमंत्र्यांच्याही निषेध करण्यात आला. दुपारनंतर सिरसाळा पोलीसांना यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याचबरोबर तालुक्यात सिरसाळा, कौडगाव,नागापूर आदि ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या