Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राजस्थानी मल्टीचे बँकिंगक्षेत्रातील कार्य कौतुकास्पद |प.पु.संत अलकाश्रीजी

 


राजस्थानी मल्टीस्टेटचे प.पु.संत अलकाश्रीजी यांच्या हस्ते नवीन जागेत स्थलांतर


आपला ई पेपर |परळी प्रतिनिधी
  

परळी येथील राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी च्या परळी येथील मुख्य कार्यालय व मुख्य शाखेचे प.पु.संत सुश्री अलकाश्रीजी यांच्या शुभहस्ते गुरुवारी (ता.७) नवीन जागेत स्थलांतर करण्यात आले.

परळी येथील  राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. परळी च्या मुख्य कार्यालय व मुख्य शाखेचे परळी येथील घरणीकर रोडवरीलभव्य इमारतीत गुरुवारी (ता.७) दुपारी एक वाजता प.पु.संत सुश्री अलकाश्रीजी यांच्या शुभहस्ते स्थलांतर करण्यात आले. अलकाश्रीजी यांचे राजस्थानी मल्टीस्टेटचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. 

यावेळी बोलताना प.पू.संत अलकाश्रीजी  म्हणाल्या की, वेळेचा सदुपयोग करा, समाज उपयोगी कार्यात सदैव सहभाग घ्या, संपूर्ण महाराष्ट्रभरात पसरलेले बंसलचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आहे. त्याचप्रमाणे राजस्थानी मल्टीस्टेटच्या संदर्भात सुद्धा बँकिंग क्षेत्रातील वाढते यश हे सुद्धा कौतुकाची बाब आहे. हे पाहून मला अभिमान वाटतो.अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रामध्ये मा.चंदुलालजी बियाणी मोठ्या जिद्दीने, चिकाटीने काम करत आहेत त्यांच्या या कार्याला व बियाणी परिवाराला सदैव आमच्या आशीर्वाद रुपी शुभेच्छा आहेत

स्थलांतरा निमित्त श्री सत्यनारायण महापूजा श्री व सौ प्रेमलता बद्रीनारायण बाहेती यांच्या हस्ते करण्यात आली. स्थलांतराच्या कार्यक्रमास राजस्थानी मल्टीस्टेटचे अध्यक्ष चंदुलाल मो. बियाणी, उपाध्यक्ष बालचंद लोढा, सचिव बद्रीनारायण बाहेती, सहसचिव पी.डी.अग्रवाल, कोषाध्यक्ष विजयप्रकाश लड्डा, संचालक अशोक जाजू, सतीश सारडा, सौ. प्रेमलता बाहेती, सौ. कल्पना बियाणी, नामदेव रोडे, अजय पुजारी, कार्यकारी संचालक जगदिश बियाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही बी कुलकर्णी, शाखा व्यवस्थापिका सौ. वंदना कांबळे यांच्यासह कर्मचारी, पतसंस्थेचे ग्राहक, ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*GR |जीआरमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही |मनोज जरांगे*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/09/gr.html*

*आता परळीत सुद्धाउपलब्ध..*

लातूर येथील सुप्रसिद्ध न्युरोसर्जन (मेंदू /मणका विकार तज्ञ) 


*Breaking |न्यूज_माझा*
*आपला ई पेपर_Online*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या