Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

उद्या जिल्हाधिकार्यांच्या हस्ते |गोपाळ आंधळे लिखीत श्रीवैद्यनाथ कथासार पुस्तकाचे प्रकाशन

 



पला ई पेपर|परळी प्रतिनिधी|

परळी व पंचक्रोशीतील देवस्थाने,ऐतिहासिक स्थळांचे अभ्यासक गोपाळ आंधळे लिखीत श्री वैद्यनाथ कथासार पुस्तकाचे उद्या दि.22 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी सौ.दिपाताई मुंडे-मुधोळ यांच्या हस्ते प्रकाशन होत असुन   या प्रकाशन सोहळ्यास परळी व पंचक्रोशीतील भाविक नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन गोपाळ यांनी केले आहे.

वैद्यनाथ औद्योगिक वसाहत सांस्कृतिक सभागृह,नाथ रोड परळी येथे शुक्रवार दि.22 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वा.होत असलेल्या या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मसाप परळीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी प्रमुख पाहुणे म्हणुन मसापचे सचिव प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड,उपाध्यक्ष प्राचार्य अरुण पवार,बंडु अघाव,अनंत मुंडे,प्रा.संजय अघाव आदींची उपस्थिती रहाणार आहे.गोपाळ आंधळे यांच्या श्री वैद्यनाथ कथासार पुस्तकात परळी पंचक्रोशीतील दुर्लक्षित परंतु धार्मिक दृष्ट्या मोठे महत्व असलेल्या देवस्थान,स्थळांची संपुर्ण माहिती आहे.याचबरोबर परळी तालुक्यातील ऐतिहासिक स्थळे,बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाबद्दल संदर्भासह माहिती असल्याने हे पुस्तक परळी व परिसराचा अभ्यास करणार्या अभ्यासक व भाविकांसाठी उपयुक्त आहे.या पुस्तकाची किंमत 170 रुपये असुन स्वागत मुल्य म्हणुन प्रकाशनाच्या दिवशी बुकिंग केल्यास 100 रुपयांना उपलब्ध करुन देण्यात आले आहे.श्री वैद्यनाथ कथासार पुस्तक प्रकाशन सोहळ्यास भाविक,नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन लेखक,मुकुंद पुजा विधी साहित्य भांडारचे मालक गोपाळ आंधळे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या