Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Beed |संपादकास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याची परळी पत्रकारांची मागणी...


परळीत जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ -मुंडे, पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांना तक्रार निवेदन

आपला ई पेपर परळी  प्रतिनिधी 

 दैनिक पुण्यभूमीचे संपादक बाळासाहेब मस्के यांना जीवे मारण्याच्या धमकीचे निनावी पत्र आले आहे त्या पत्रात जाती वाचक तसेच खालच्या पातळीचे शब्द वापरले आहेत. बी आर एस पक्षातील काम थांबवा अन्यथा आम्ही तुला गोळ्या घालून दाभोळकर करू तुला खोट्या केस मध्ये अडकवू अशी धमकी देण्यात आली आहे त्यामुळे त्यांच्यासहित कुटुंबांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याबाबत..

 परळीत दि २२ रोजी मा जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ -मुंडे मॅडम यांना दैनिक पुण्यभूमीचे परळी तालुका प्रतिनिधी भगवान साकसमुद्रे यांनी भेटून निवेदन दिले.

 परळी येथील संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस व परळी पोलीस स्टेशनचे ठाणे आमलदार श्री लव्हारे यांना तक्रार निवेदन देऊन तात्काळ निनावी पत्र धाडणाऱ्या व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन त्याला अटक करावी अशी मागणी करण्यात आली अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनात देण्यात आला. या निवेदनावर परळीतील पत्रकार भगवान साकसमुद्रे ,ओमप्रकाश बुरांडे,रानबा गायकवाड, जगदीश शिंदे, धनंजय आरबुणे, मोहन व्हावळे, दत्तात्रय काळे, महादेव गित्ते, महादेव शिंदे ,गोपाळ आंधळे, अफसर सय्यद, आदींच्या स्वाक्षरी आहेत .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या