Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

नाथ प्रतिष्ठाणच्या वतीने गणेशोत्सवात ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे किर्तन

आपला ई पेपर 

परळी वैद्यनाथ दि.26 कृषिमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करून अत्यंत साध्या पद्धतीने परळी वैद्यनाथ येथे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. प्रतिवर्षी परंपरेचा एक भाग म्हणून ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार (दि. 27) रोजी परळी शहरातील हालगे गार्डन येथे सायंकाळी 8 वा. प्रसिद्ध विनोदी कीर्तनकार व समाज प्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या सुश्राव्य प्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या कीर्तन-प्रबोधन कार्यक्रमाचा लाभ परळी वैद्यनाथ शहरासह परिसरातील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. 

प्रतिवर्षी विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नाथ प्रतिष्ठाण मार्फत सार्वजनिक गणेशोत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. मात्र यावर्षी शेतकऱ्यांवर ओढावलेल्या नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय धनंजय मुंडेंनी घेतला होता व त्यानुसार ना.मुंडे यांच्या जगमित्र या संपर्क कार्यालयात साध्या पद्धतीने श्री गणेशाची स्थापना करण्यात आली होती. 


प्रतिवर्षी नाथ प्रतिष्ठाणच्या गणेशोत्सवात नवव्या दिवशी ह.भ.प.इंदुरीकर महाराजांचे समाज प्रबोधनपर कीर्तन आयोजित करण्याची परंपरा नाथ प्रतिष्ठाण ने जपली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी सायंकाळी हालगे गार्डन येथे ह.भ.प.इंदुरीकर महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती नाथ प्रतिष्ठाणचे सचिव नितीन मामा कुलकर्णी यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या