Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

जागृती नागरी सहकारी पतसंस्थेस सरत्या आर्थिक वर्षात संस्थेस 46 लाखांचा नफा प्रा. गंगाधर शेळके

परळी प्रतिनिधी


येथील जागृती नागरी सहकारी पतसंस्थेची  35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 24   सप्टेंबर रोजी सकाळी 11:00 वा. येथील भागवत पॅलेस च्या सभागृहामध्ये जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. शोभाताई शेळके यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली असून सरत्या आर्थिक वर्षात जागृती पतसंस्थेस 46.37 लाखांचा नफा झाल्याची माहिती जागृती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गंगाधर शेळके सर यांनी दिली आहे.

  याबाबत माहिती अशी की मराठवाड्याच्या आर्थिक तथा सहकार क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या जागृती नागरी सहकारी पतसंस्थेची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 24 सप्टेंबर रोजी संचालक मंडळ, विविध मान्यवर, सभासद, हितचिंतक आदींच्या उपस्थितीत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ तथा उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या वतीने कर्मचाऱ्यांनी केला. त्यानंतर प्रस्ताविक करताना अहवाल वाचन व संस्थेचा अर्थिक लेखाजोखा तथा प्रगतीचा आलेख संस्थेच्या अध्यक्षा प्रा. शोभाताई शेळके यांनी मांडला. बँकेच्या वतीने ग्राहकांना पुरविण्यात येणाऱ्या सुलभ सोनेतारण, वाहनतारन, आदिसह विविध सुविधांची माहिती देण्यात आली. 

     यावेळी पुढे बोलताना जागृती नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक प्रा गंगाधर शेळके सर यांनी सांगितले की, संस्थेच्या परळीतील मुख्य शाखेसह अंबाजोगाई व सिरसाळा येथे शाखा कार्यरत असून घाटनांदुर ची शाखा प्रस्तावित आहे. संस्थेमध्ये जवळपास 22 कर्मचारी आणि 25 पिग्मी एजंट असे जवळपास 47 कर्मचारी कार्यरत आहेत. संचालक मंडळ व कर्मचारी वृंद यांच्या सौजन्य पुर्ण सेवेमुळे बँकेची उत्तरोत्तर प्रगती होत असल्याचे  सांगितले.  जागृती नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक उलाढाल 236.15 कोटी रुपये असून संस्थेकडे 73 कोटींच्या ठेवी जमा आहेत. 2022 ते 2023 या आर्थिक वर्षामध्ये संस्थेस 46.37 लाखांचा नफा झाला असून संस्थेची इतर ठिकाणची गुंतवणूक 46.99 कोटी रुपये असल्याची माहिती प्रा. शेळके सर यांनी दिली.

     जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांच्या गुणवंत पाल्यांना प्रोत्साहन पर बक्षिसे देत त्यांचा सत्कार देखील संस्थेच्या वतीने करण्यात आला. यावेळी संस्थेचे मा.संचालक विजयकुमार देशमुख तथा विद्यमान संचालक वैजनाथराव सोळंके व प्रा. अवस्थी सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

   याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गंगाधर शेळके सर, संस्थेचे अध्यक्षा प्रा. शोभाताई शेळके, सचिव वसंतराव सूर्यवंशी कोषाध्यक्ष संतोष चव्हाण, संचालक सर्वश्री ॲड प्रकाश मराठे, लक्ष्मण कोठावळे, वैजनाथ सोळंके, राहुल शेळके, श्रीमती चंद्रकला मगर, चंद्रकांत टाक, मारुती बोबडे, शेख गफार, आदींसह फाउंडर मेंबर, सभासद, हितचिंतक, वकील डॉक्टर्स आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. या सभेच्या यशस्वीतेसाठी जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व कर्मचारी वर्ग व पिग्मी एजंट यांनी परिश्रम घेतले. या सभेचे सूत्रसंचालन संस्थेचे प्रशासकीय अधिकारी हेमंत कुलकर्णी यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या