Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

वाघाळ्यातील गजाकोष यांना ॲड.माधव जाधव यांनी दिला मदतीचा हात..

आपला ई पेपर परळी 


वाघाळा ता.अंबाजोगाई येथील पिडीत सतीश गजाकोष यांना एक मुलगी व एक मुलगा अशी दोन मुलं होती, त्यांच्या दोन्ही मुलांना डेंगु झाला होता. डेंगु आधाराने लहान मुलगा आदर्श सतीश गजाकोश व मुलगी पुनम सतीश गजाकोश यांचा 15 दिवसांच्या आत उपचारादरम्यान मृत्यु झाला.

सतीशराव गजाकोष हे मजुरी करतात.त्यांच्या कुटुंबाला उत्पन्नाचे इतर कोणतेही साधन नाही.मजूरी शिवाय दुसऱा कोणताही पर्याय नाही.घरामध्ये पत्नी,आई असा परिवार आहे.मुलीच्या उपचारासाठी सतीश गजाकोष यांनी हात उसने पैसे घेतले होते. 

परळी विधानसभा BRS  प्रमुख ॲड. माधव जाधव यांना समजल्यानंतर ॲड.माधव जाधव यांनी वाघाळा येथे जाऊन कुटुंबीयांची भेट घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले .तसेच ॲड.माधव जाधव यांनी  (दहा हजार रुपये )१००००/-आर्थिक मदत पिडीत सतीश गजाकोष यांना केली व होईल ती मदत करण्याचे आश्वासन ॲड.माधव जाधव यांनी यावेळी दिले.

यावेळी समस्त वाघाळा शिवाजी चौक  अंबा साखर कारखाना मित्रपरिवार उपस्थित होते.


*भिषण अपघात ट्रॅव्हल्स खाली चिरडून एका प्राध्यापकाचा दुर्दैवी मृत्यू *

*https://aplaepaper.blogspot.com/2023/09/blog-post_42.html*

*हेडलाईन्स*
*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*

👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या