आपला ई पेपर| Beed |
साहित्यिक प्रा.श्रावण गिरी यांचा ट्रॅव्हल्स खाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात ट्रॅव्हल्स ने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे.कर्जत येथे नोकरीस असलेले बीड येथील रहिवासी प्रा. श्रावण गिरी हे सायंकाळी औरंगाबाद वरून आले होते.
कर्जतला जाण्यासाठी ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले होते. तेथून ट्रॅव्हल्स ने जाण्यासाठी ते रस्ता ओलांडत असताना ट्रॅव्हल्स ने त्यांना धडक दिली, त्यामध्ये त्यांच्या पायावरून गाडी गेल्याने ते खाली पडले.चौकात असलेल्या काही प्रत्यक्षदर्शी तरुणांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात दररोज किमान वीस ते पंचवीस ट्रॅव्हल्स उभ्या असतात. रस्त्यावरच प्रवासी भरले जातात. यामुळे अनेकवेळा अपघात झाले आहेत. मात्र पोलीस प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याने आज प्रा गिरी यांना आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून चौकात उभ्या राहणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकांवर कारवाई करणे आवश्यक आहे.
*प्रचंड व्हायरल...*
*पंकजाताई मुंडे यांच्या 'शिव-शक्ती' परिक्रमेची आज श्रीघृष्णेश्वरच्या दर्शनाने होणार सुरूवात*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/09/12.html*
*GOOD |NIGHT |SONG | आठवणीतील गीत*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/09/good-night-song_3.html*
*हेडलाईन्स*
*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*
*संतोष बारटक्के*
*9423472426*
Social Plugin