Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत अवैध धंद्याचा सुळसुळटा, बिनधास्तपणे टायगर नावाचा जुगार विविध ठिकाणी भर रस्त्यावर चालू....

आपला ई पेपर 


परळी शहरातील शहर व संभाजीनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चालू असलेले  मटका,बिंगो,अवैध गुटका विक्री, जुगारा सारखे अवैद्य धंदे तात्काळ बंद करा अन्यथा परळी शहर काँग्रेसच्या वतिने आंदोलन करण्याचा इशार काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुरभाई यांनी दिला होता. तेवढ्या काळापुरता मलमपट्टी करून पुन्हा अवैद्य धंदे सुरू झाले आहेत.परळी शहरात अवैध धंद्याचा सुळसुळटा वाढला असून बिनधास्तपणे टायगर नावाचा जुगार परळी परिसरातील विविध ठिकाणी भर रस्त्यावर चालू आहे. 

पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या दर्शनासाठी श्रावण सोमवार असल्यामुळे परळीमध्ये भाविकांचे गर्दी होते. याचाच फायदा घेऊन टायगर जुगार व्यवसाय भाविकांची लूट करीत आहे. वेळेवर जर पोलिसांनी कारवाई केली नाही तर हजारो भाविकांची लूट होण्याची शक्यता आहे. 

परळी शहर काँग्रेसच्या वतिने आज जुनमध्ये शहर व संभाजी नगर पोलिस स्टेशनला शहराध्यक्ष बहादुरभाई यांच्या नेतृत्वावात निवेदन देण्यात आले होते.या निवेदनात म्हटले होते कि,यापुर्वी बीडच्या पोलिस अधीक्षकांना यांनाही निवेदन दिले होते परंतु आज पर्यंत या निवेदनाची दखल घेतली गेली नसल्यामुळे परंत आज परळी शहरात प्रत्येक रस्त्याच्या कॉर्नरवर बिंगो नावाचा चालू आहेत

परळी शहर पोलिस स्टेशन व संभाजी नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत अनेक अवैध धंदे चालू असून त्यात मुख्यता बिंगो आणि गुटका जोराने चालू आहेत. बिंगोमुळे नव युवक देशोधडीला लागत असुन कर्ज बाजारी होत असून व्याजदारी वाढत आहे आणि कर्जा पोटी चुकीचे काम नव युवक करीत असल्याचे चित्र दिसून येत असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.परळी शहरातील सर्व अवैध धंदे तत्काळ बंद करावे, नुसताच बंद न करता ते पून्हा  सुरू होणार नाही या बाबत गांभिर्यानी दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात यावी सात अवैध धंदे बंद झाले नाही तर परळी शहर काँग्रेस आपल्या पोलिस स्टेशन समोर तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शहराध्यक्ष बहादुरभाई व त्यांच्या शिष्टमंडळाने दिला होता. त्या निवेदनाला महिन्याभरातच केचर्याची टोपलि दाखविली असल्यामुळे सदरील निवेदनावर कसलीही कारवाई झाल्याचे दिसत नसल्याची चर्चा परळी परिसरातील नागरिक करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या