Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

प्रचंड जल्लोष ..पंकजाताई मुंडे यांच्या स्वागतासाठी जनसागर..

शिव-शक्ती परिक्रमा अन् पराक्रमही..!


बार्शी, नगर ते बीड, ठिक ठिकाणी झालं 'न भूतो न भविष्यती' स्वागत


आपला ई पेपर 

बीड शिव-शक्ती परिक्रमेचा आजचा सहावा दिवस अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणारा ठरला. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचं स्वागत करण्यासाठी बार्शी,अहमदनगर ते बीड दरम्यान प्रचंड जनसागर  लोटला होता. जोश अन् जल्लोषासह 'न भूतो न भविष्यती' असं जोरदार स्वागत झालं. 

पंकजाताई मुंडे हया सकाळी धाराशीवमधून रवाना झाल्या. परंडा येथे त्यांचं मोठया उत्साहात जंगी स्वागत झालं. आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या परिवाराचंही स्वागत स्विकारलं. सोलापूर जिल्ह्य़ात प्रवेश केल्यानंतर नारेवाडी, कदम वस्ती, वारदवाडी, पिंपळवाडी येथे स्वागत झाल्यानंतर बार्शी शहरात आ. राजाभाऊ राऊत स्वतः कार्यकर्त्यांसह त्यांच्या स्वागताला हजर होते. याठिकाणी त्यांचं मोठया जल्लोषात वाजत-गाजत स्वागत झालं. या भागाने लोकनेते मुंडे साहेबांइतकंच माझ्यावरही प्रेम केलं आहे. जनतेची सेवा आणि शक्ती वाढविण्याकडे समर्पित भावनेनं काम करण्याची शक्ती दे अशी प्रार्थना त्यांनी जनतेशी संवाद साधताना केली. करमाळा येथे ग्रामदैवत कमलाई  देवीची ओटी भरली आणि मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिर  परिसरात कार्यकर्ते, भाविक भक्त तसेच व्यवस्थापन समितीने अतिशय उत्साहात मोठे स्वागत केले.


जामखेड, खर्डयात मोटरसायकल रॅली


अहमदनगर जिल्हयात जामखेड, खर्डा येथे भव्य मोटरसायकल रॅली काढून पंकजाताई मुंडे यांचं जोरदार स्वागत झालं. जामखेड शहरात आगमन होताच कार्यकर्त्यांनी जेसीबीतून फुलांची उधळण करत खूप जल्लोषात स्वागत केलं. खा. डाॅ सुजय विखे, आ. राम शिंदे यावेळी उपस्थित होते. माझी ही परिक्रमा फक्त शिव आणि शक्तीचे दर्शन घेण्यासाठी होती पण ठिक ठिकाणी जनता जनार्दनाचा एवढा उदंड प्रतिसाद मिळाला की, त्यांच्या प्रेमाने मी भारावून गेले असं त्या यावेळी म्हणाल्या.

बीड जिल्हयात दिमाखदार प्रवेश ; पाटोद्यात संत भगवानबाबा जयंती

पंकजाताई मुंडे यांचं बीड जिल्ह्य़ात दिमाखदार स्वागत झालं. पांचग्री, येवलवाडी, सोनेगाव, वैद्यकिन्ही, पाटोदा येथे संत भगवान बाबा यांच्या जयंतीनिमित्त त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी स्वागताला जनसागर उसळला होता, परिक्रमा दर्शनाची, पराक्रम जनतेचा असंच चित्र आजच्या दिवसाचं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या