Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

भावी मुख्यमंत्री पंकजा मुंडे राजकीय वर्तुळात खळबळ.

 

आपला ई पेपर


महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठा हात बीड जिल्ह्याचा असतो. बीड जिल्ह्यातील  घटना ही महाराष्ट्राच्या राजकारणात परिणाम करते हे आतापर्यतचा इतिहास आहे. याच धरतीवर बीड जिल्ह्यात एक बातमी जास्त व्हायरल झाली आहे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे भावी मुख्यमंत्री


असा उल्लेख असलेले बॅनर बीड जिल्ह्यात लावण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पंकजा मुंडे यांची शिवशक्ती यात्रा आज बीडमध्ये येणार आहे. या पार्श्वभूमीवर बीडच्या तेलगावमध्ये हे बॅनर लावण्यात आले आहेत.वरिष्ठ नेत्यांचे फोटो गायब "भावी मुख्यमंत्री पंकजा मुंडे" असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे. विशेष म्हणजे भाजपाच्या सर्व स्थानिक नेत्यांचे या बॅनरवर फोटो आहेत, माञ भाजपमधील कुठल्याही वरिष्ठ नेत्याचा फोटो या बॅनरवर नाहीये. या बॅनरखाली भारतीय जनता पार्टी धारूर असा उल्लेख करण्यात आला आहे.

या बॅनरमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. पंकजा मुंडे यांचं भव्य स्वागत दरम्यान दुसरीकडे पंकजा मुंडे यांची शिवशक्ती यात्रा सोलापूरमध्ये पोहोचली असता, बार्शीमध्ये त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. पंकजा मुंडे यांच्यावर फुलांची उधळण करत त्यांना जेसीबीनं हार घालण्यात आला. त्यांनी बार्शी येथील प्रसिद्ध भगवंत मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी पंकजा मुंडे यांचं जोरदार स्वागत केलं. तसेच यावेळी कार्यकर्त्यांनी देखील जोरदार घोषणाबाजी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या