Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बीड परळी स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी.. दोन कुख्यात आरोपी जेरबंद


आपला ई पेपर



अंबाजोगाई शहर हद्दीतील अंबाजोगाई ते लातुर जाणारे  रोडवर मोटार सायकल वरून रॉबरी व धुनकवाडी धारुर  पोलीस असल्याची बतावणी करून लुटणारी गँग निष्पन्न करून दोन कुख्यात आरोपींना स्था.गु.शा. बीड ने केले जेरबंद.. तपासात विविध गुुन्ह्याची कबुली आई सणाच्या व गणपतीच्या बंदोबस्तातही पोलिसांचे उल्लेखनीय कामगिरी केली असून अनेक गुन्ह्यातील फरार आरोपी बीड गुन्हे शाखेने जर बंद केला आहे

आंबेजोगाई येथील घटनेत लुटलेल्या चोरीची फिर्यादी अंबाजोगाई पोलिसात दिली असता फिर्यादी  श्यामसुंदर श्रीरंगराव मोरे वय 65 रा. मोरेवाडी अंबाजोगाई यांनी दिनांक 31/08/2023 रोजी फिर्याद दिली की ते दिनांक 30/08/2023 रोजी 08.30 वा. चे सुमारास गारवा हॉटेलचे समोर अंबाजोगाई ते लातुर जाणारे रोडवर त्यांचे शेतातुन रोडने घराकडे जात असतांना दोन अनोळखी इसमांनी पाठीमागुन मोटार सायकल वरून येवून त्यांचेजवळ थांबवली व लगेच उतरुन त्यांचे दोन्ही हात धरुन पिरगाळुन हातातील दोन अंगठया व गळयातील दोन तोळयाचे सोन्याचे लॉकेट असा एकुण 03 तोळे आठ ग्राम किमती 1,05,000/- रु चा माल बळजबरीने चोरून पळुन गेले. यावरून पो.ठा. अंबाजोगाई शहर गुरनं 325 / 2023 कलम 392,34 भादंवि प्रमाणे दिनांक 31/08/2023 रोजी गुन्हयाची नोंद झाली होती.

मा. पोलीस अधीक्षक, बीड यांनी उक्त नमुद जबरी चोरीचा गंभीर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोनि स्थागुशा यांना आदेश दिले होते त्यावरून पो नि स्थागुशा यांनी अशा प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहिती काढत असतांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा हयात अली बाबुलाल अली सय्यद (इराणी) व मिस्कीन जावेद जाफरी रा परळी याने त्याचे इतर साथीदारासह केल्याची खबर मिळताच पोनि स्थागुशा यांनी तात्काळ पोउनि खटावकर व स्टाफ यांना खबर ठिकाणी रवाना होवून आरोपी शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले.

स्थागुशा पथकाने टोकवाडी परळी येथुन सापळा रचुन पाठलाग करून शीताफिने ताब्यात घेवून नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1 ) हयात अली बाबुलाल अली सय्यद ( इराणी) वय 38 रा- इराणी मोहल्ला श्रीरामपुर जि. अहमदनगर, 2) मिस्कीन जावेद जाफरी वय 22 वर्षे रा. इराणी गल्ली परळी जि-बीड यांना गुन्हयाबाबत विचारपुस करता त्यांनी व त्यांचे इतर एक साथीदार अशा तिघांनी गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. त्याचे ताब्यातुन गुन्हयात वापरलेली मोटार सायकल जप्त करण्यात आली असून सदर जप्त केलेली युनीकॉर्न मो.सा. ही पोस्टे गेवराई येथे चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

तसेच त्यांनी पो.स्टे. धारूर हद्दीत दिनांक 02-09-2023 रोजी धुनकवाडी फाटा धारूर रोडवर गाडी आडवून आम्ही सीबीआय पोलीस असल्याची बतावणी करून दिड तोळयाचे सोन्याचे लॉकेट व बदाम असा 90000/- रुमाल बतावणी करून नेवून फसवणुकी चा पो.ठा.धारुर येथे गुरनं 281 / 2023 कलम 420,170 भादंवि प्रमाणे गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.

यातील आरोपी हयात अली बाबुलाल सय्यद इराणी अभीलेखावरील सराईत गुन्हेगार असून पो.स्टे. लोणी काळभोर (पुणे शहर) येथील MCOCA (मोक्का) गुन्हयात फरार आरोपी आहे. तसेच त्याचेवर अहमदनगर जिल्हयात पोस्टे कोतवाली (07), लोणी (01), तोफखाना (02), श्रीरामपुर शहर (02), पुणे शहर येथील पोस्टे वारजे माळवाडी (1), भारती विद्यापिठ (1), वानवाडी (01), विश्रामबाग (01), कोथरुड (1), ठाणे शहरातील पो.स्टे. महात्माफुले चौक (01), ठाणे ग्रामीण जिल्हयातील पोस्टे भीवंडी (02) असे एकुण (20) गुन्हे जबरी चोरी व बतावणी करून

फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी मिस्कीन जावेद जाफरी रा. परळी याचे वर लातुर जिल्हयात पोस्टे गांधी चौक येथे बतावणी करून फसवणुकीचे (02) गुन्हे दाखल आहेत.

वरील दोन्ही आरोपीतांना पो.स्टे. अंबाजोगाई शहर यांचे ताब्यात देण्यात आले असून त्यांचे कडून मालाविरुध्दचे इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुढील तपास पो.ठा. अंबाजोगाई शहर व व स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व अंमलदार करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. नंदकुमार ठाकुर पोलीस अधीक्षक बीड, मा. अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. संतोष साबळे, पोउपनि श्रीराम खटावकर, सफौ / सलीम शेख, पोह/ मनोज वाघ, प्रसाद कदम, देविदास जमदाडे, निलेश ठाकुर, पोना/विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, पोशि/सचिन आंधळे अश्विनकुमार सुरवसे, चापोशि/ अशोक कदम सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी केलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या