Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

तलवारी बाळगणा-या इसमास अंबाजोगाई शहर पोलिसांनी ठोकल्या बेडया,१२ तलवारी केल्या जप्त

आपला ई पेपर | अंबाजोगाई

 परिसरात गुन्हेगारी कृत्य करण्याच्या उद्देशाने तलवार बाळगणाऱ्या ममदापुर येथील आदित्य काटे या आरोपीच्या अंबाजोगाई पोलिसांनी मुसक्या आवळल्या असुन त्याच्या कडुन १२ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत

गोपनीय मिळालेल्या माहीतीच्या आधारे शहरातील लातुर रस्ता पाण्याची टाकी भागात एक इसम हातात तलवार घेवुन फिरत आहे.

 अशी माहीती मिळाल्यावरुन पोलीस ठाण्याचे पथक सदर ठिकाणी जावुन अचानक छापा मारला असता ईसम नामे आदीत्य आनंद काटे वय १९ वर्षे रा. ममदापुर ता. अंबाजोगाई असे सांगीतले त्याचे ताब्यात एक तलवार मिळुन आली

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घोळवे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक बालक कोळी, पोलीस उपनिरीक्षक चाँद मेंढके  पो/१६७१ गायकवाड, पो/ ९७३ घोळवे, पो/ ५०९ लाड, पो/ २०२० नागरगोजे, पो८९० चादर, पो/ १७० काळे, चालक पो.कॉ/१९८० व्हावळे, होमगार्ड मुसा शेख यांनी त्याचे कडे अधिक विचारपुस केली असता त्याने अद्याप पावेतो गुन्हयाचे तपासा दरम्यान अंबाजोगाई तालुक्यातील राडी व ममदापुर शिवारात लपवून ठेवलेल्या १२ तलवारी किंमत अंदाजे १८,०००/- रुपये किंमतीचे काढुन दिलेल्या असुन आणखीही तलवारी जप्त होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी पो हे कॉ अमोल गायकवाड यांच्या फिर्यादी वरून गु. र. न. ३६४/२३ !४/२५ भारतीय शस्त्र कायदा,१३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम, या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

शस्त्र बाळगणाऱ्यावर कठोर कार्यवाही

गणेशोत्सव व ईद च्या अनुषंगाने पोलीस यंत्रणेने नागरीकांना आवाहन केले आहे कि, अशा प्रकारचे शस्त्र बाळगण्याचे कृत्य करु नये पोलीस यंत्रणा अशा घटनावर लक्ष ठेवुन आहे. कोणी अशा प्रकारचे कृत्य केल्यास त्याचेवर कठोरात कठोर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या