Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत वैधनाथ बँक कर्मचारी गणेशोत्सव २०२३ मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबीर

 आपला ई पेपर |Parli 


वैद्यनाथ बँक कर्मचारी गणेश मंडळ व वैद्यनाथ ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने दि.25 सप्टेंबर 2023 सोमवार रोजी सकाळी 10 वाजता भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

 या शिबिरांत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन वैद्यनाथ बँक कर्मचारी गणेश मंडळाचे अध्यक्ष शेखर काळे ,उपाध्यक्ष प्रकाश गिते, व सचिव ऋषी कौलवार, कोषाध्यक्ष सुजित गिते यांनी केले आहे.

सर्वसामान्य नागरिकांमध्ये रक्तदानाविषयी असलेले गैरसमज दूर व्हावेत व त्याचे महत्व लोकांना समजावे हा या शिबिराचा उद्देश हा आहे. ‘रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान’ आहे. रक्तदान ही जनसामान्यांची जनसेवा हीच गणेशाची सेवा हेच आमचे ध्येय आहे.असे मत वैद्यनाथ बँक कर्मचारी गणेश मंडळाचे आहे.  

या रक्तदान शिबिरात सर्वांनी सहभाग घ्यावा तसेच युवा पिढीने सहभाग घेऊन रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या