Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

2000 जण मृत्यू, प्रचंड हानी,मोरोक्कोत मोठा भूकंप...

 


भूकंपात अनेक घरे आणि इमारती जमीनदोस्त झाल्या. त्यामुळे रात्री गाढ झोपेत असलेले नागरिक झोपेतच गाडले गेले. या भूकंपात आतापर्यंत दोन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्या ठिकाणी ढिगारा उपसला जातोय तिथे मृतदेह सापडत आहेत. मृतदेह सापडत नाही अशी एकही जागा नाही. अख्खा दिवस गेला, रात्र सरली तरी मृतदेह निघायचं थांबत नाहीये. मृत्यूचं असं तांडव कधीही कुणी पाहिलं नव्हतं, इतकं भयानक दृश्य सध्या मोरोक्कोत झालं आहे. एखाद्या भीतीदायक भागासारखा मोरोक्कोतील प्रत्येक भाग दिसत आहे.


मोरोक्कोत प्रचंड भूकंप झाल्याने प्रचंड हानी झाली आहे. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. सोशल मीडियात त्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या भूकंपात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. भूकंपात कुणाचा मुलगा गेलाय, कुणाचा बाप, कुणाची आई, तर कुणाचे आजीआजोबा. मोरोक्कोतील प्रत्येक चेहऱ्यावर उदासपण आहे. लोक धायमोकलून रडत आहेत. त्यांचे अश्रूच थांबताना दिसत नाहीये. तर काहींचे रडून रडून डोळे सूजले आहेत. सांत्वन करावे तर कुणाचे करावे? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. कारण प्रत्येकाच्या घरातील कोण ना कोण या भूकंपाने हिरावून घेतला आहे. मोरोक्कोत अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. देशात तीन दिवसाचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या