Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

'या' शाळेच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी रुपये 10 लाख रुपयांची मदत..


इंडोको रेमेडीजकडून महाराष्ट्र विद्यालयास सौर ऊर्जा प्रकल्पासाठी मदत

आपला ई पेपर #परळी प्रतिनिधी

इंडोको रेमेडीज या मुंबई स्थित औषध कंपनीकडून त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाअंतर्गत बीड जिल्ह्यातील ग्रामीण दुर्गम ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या महाराष्ट्र विद्यालय, मोहा या शाळेच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी रुपये 10लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.झुंजार स्वातंत्र्यसेनानी,जिल्ह्याचे माजी खासदार कॉ. गंगाधरआप्पा बुरांडे यांनी सण 1960 मध्ये स्थापन केलेली ही शाळा सहा दशकांहून अधिक काळ समाजातील वंचित घटकांना सक्षम करण्यासाठी समर्पित आहे. 

विशेषतः ऊस उत्पादक शेतकरी, वीट विक्रेते, मजूर, शेळीपालक आणि आर्थिकदृष्ट्या विकलांग कुटुंबातील मुलांसाठी ही शाळा आशेचा किरण आहे. शाळेचे वसतिगृह वारंवार स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

या शाळेमध्ये इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या सुमारे 2 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत असून ग्रामीण भागात दुर्गम ठिकाणी वसलेल्या या शाळेला वीज आणि इतर मूलभूत सुविधांशी संबंधित आव्हानांचा सामना करावा लागतो. या अत्यावश्यक गरजेचे महत्त्व ओळखून, इंडोको रेमेडिज या कंपनीने शाळेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला पाठिंबा देण्यासाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांतर्गत पुढे पाऊल टाकले आहे. या परिवर्तनीय प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात इंडोकोने 10लाखाची आर्थिक मदत दिली आहे.


या निमित्ताने आयोजित सहयोग कार्यक्रमात, इंडोकोचे प्रतिनिधी वरिष्ठ महाव्यवस्थापक समीर दैनी,अतुल कुलकर्णी, गोरक्षनाथ वामन, नितीन देशपांडे,योगेश मुक्कावार, प्रसाद भिसे, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सचिव एड.अजय बुरांडे,संचालक सुदामदादा देशमुख, सुदाम शिंदे, प्राचार्य धंनजय देशमुख आदीसह सर्व प्रशासकीय अधिकारी,शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


●●●●●●●●●●●●

इंडोको रेमेडिज हि सामाजिक बांधिलकीचे मूल्य जपणारी कंपनी असून वंचितांच्या जीवनात अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी वचनबद्ध आहे. महाराष्ट्र विद्यालय मोहा या शाळेच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाद्वारे उज्वल भविष्य प्रदान करून त्यांना सक्षम करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याचा आम्हाला अभिमान आहे.


●आदिती कारे पाणंदीकर

व्यवस्थापकीय संचालिका इंडोको रेमेडिज प्रा.लिमिटेड

मुंबई


●●●●●●●●●●●●

इंडोको रेमेडिज या कंपनीने सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केलेली मदत ही मौलाचा दगड असून ग्रामीण आणि दुर्गम भागात असलेल्या आमच्या शाळेत व शाळेच्या वसतीगृहात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असतो. इंडोको रेमेडिज कंपनीने सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी केलेल्या या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात येणारा मोठा अडथळा दूर होण्यास मदत झालेली आहे.


धंनजय देशमुख

प्राचार्यमहाराष्ट्र माध्य व उच्च माध्य विद्यालय मोहा ता-परळी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या