Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

भेल संस्कार केंद्रात 'मराठवाडा मुक्ती संग्राम दिन' उत्साहात साजरा...

आपला ई पेपर 


परळी येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित भेल संस्कार केंद्रात 'मराठवाडा मुक्ती संग्राम दिन' मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या लढ्यास 75 वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा सोहळा साजरा करण्याचा दुग्धशर्करा योग जुळून आल्यामुळे या दिनास विशेष महत्त्व आहे. तत्पूर्वी या दिनाला 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे "सांस्कृतिक वार्ता पत्राचा" "लढा! मराठवाडा मुक्ती संग्रामाचा!! या  विशेषांकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला होता.


या कार्यक्रमाची टॅगलाईन म्हणजे 'हिंदूच्या मनातील हिंदुत्वाची तार छेडणे' अशी होती. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी जुगल किशोर लोहिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.भेल संकुलातील विद्यार्थ्यांनी आपापली मनोगते व्यक्त केली. 

यावेळी पुढे बोलताना जुगलकिशोर लोहिया म्हणतात की "मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव असतो, हा सण दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. ह्या दिवशी एक क्रूर, जुलमी, निर्दयी निजामाची राजवट मराठवाड्यातून संपुष्टात आली होती. ह्या संपूर्ण लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी समर्थपणे पार पाडून निजामाच्या जोखडातून मराठवाड्यास मुक्त करून ते भारतीय संघराज्यात समाविष्ट केल्या गेला होता. यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. याचे आपण सर्वांनी स्मरण ठेवून हा दिन दरवर्षी आनंदात साजरा केला पाहिजे असे मत व्यक्त करून विविध घोषणांनी संकुलाचा परिसर दुमदुमून गेला होता. शेवटी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन जुगलकिशोर लोहिया यांनी आपले मनोगत पूर्ण केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या