Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

NCP | अजितदादा यांच्या स्वागतासाठी बीड नगरी सज्ज ..

आपला ई पेपर 


मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली सभेची जय्यत तयारी

NCP |बीड शहरात होत असलेली सभा ही कोणालाही उत्तर देण्यासाठी नाही तर उत्तरदायित्वाची सभा आहे,असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी म्हटले आहे त्यानुसार अजितदादा पवार तसेच पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष खा.प्रफुल्ल भाई पटेल, प्रांताध्यक्ष खा. सुनील तटकरे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत रविवारी बीड येथे जाहीर सभा संपन्न होणार आहे. 

या सभेचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार नियोजन करण्यात येत असून अजितदादांसह सर्वच मंत्र्यांच्या व मान्यवरांच्या स्वागतासाठी बीड नगरी सज्ज झाली आहे. जागोजागी स्वागतच्या कमानी व फलक उभारण्यात आले असून, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.

भव्य रॅली ..दुपारी दीडच्या सुमारास बीड शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करतील, त्यानंतर मुख्य रस्त्यावरील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून भव्य रॅलीस सुरुवात होईल. रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोचून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मान्यवरांचे सभास्थळी आगमन होईल.


बाहेरून येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था

सबंध बीड जिल्ह्यातून हजारो लोक या कार्यक्रमासाठी येणार असून परळी मतदारसंघातून 150 एसटी बसेस बुक करण्यात आल्या आहेत. या सर्व बसेसची पार्किंग व्यवस्था जिल्हा रुग्णालयाच्या मागील जुन्या एसपी ऑफिसच्या मैदानात करण्यात आलीय. त्याचबरोबर खाजगी वाहनांसाठी बार्शी रोडवरील सोमेश्वर मंदिरासमोरील नदीपात्र मैदान, आशीर्वाद लॉन्स, ज्ञानेश्वर पब्लिक स्कुलचे मैदान राखीव ठेवले आहे. अहमदनगर रस्त्यावर आष्टी-पाटोदा-शिरूर भागातून येणाऱ्या वाहनांना आयटीआय मैदान व चंपावती शाळेचे मैदान तर बीड तालुक्यातील वाहनांना माने कॉम्प्लेक्स जवळील पारस मैदान राखीव ठेवले आहे. मोंढा रोड वरील फटाका मैदान तसेच जालना रोड वरील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागील उत्तम नगर परिसर मैदान पार्किंग साठी राखीव ठेवण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर आबा चव्हाण यांनी दिली आहे. 


परळी पॅटर्नची जिल्ह्यात चर्चा

बीड शहरात प्रथमच परळी प्रमाणे नियोजन करण्यात येत असून ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली हे सुरेख नियोजन करण्यात आले असल्याची चर्चा जिल्हाभरात आहे.

*भोवती कितीही गढूळ पाणी असलं, तरी आपलं "नितळपण" जपता आलं पाहिजे..*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_39.html*

*हेडलाईन्स*
*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

*Breaking|Political|Crime*
*आपला ई पेपर*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_64.html*

*लातूर येथील सुप्रसिद्ध न्युरोसर्जन (मेंदू /मणका विकार तज्ञ)*

आता *परळीत सुद्धा* उपलब्ध..संपर्क
*774 199 7019*
(Advt.)

*छोट्या जाहिरातीसाठी संपर्क*
*संतोष बारटक्के*
*9423472426*

*हेडलाईन्स*
*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

*Breaking|Political|Crime*
*आपला ई पेपर*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_64.html*

*लातूर येथील सुप्रसिद्ध न्युरोसर्जन (मेंदू /मणका विकार तज्ञ)*

आता *परळीत सुद्धा* उपलब्ध..संपर्क
*774 199 7019*
(Advt.)

*छोट्या जाहिरातीसाठी संपर्क*
*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या