Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

भोवती कितीही गढूळ पाणी असलं, तरी आपलं "नितळपण" जपता आलं पाहिजे कसं..

 आपला ई पेपर |स्पेशल 


भोवती कितीही गढूळ पाणी असलं, तरी आपलं "नितळपण" जपता आलं पाहिजे...

सकारात्मक विचारसरणी, शुध्द आणि प्रामाणिक हेतू, परोपकराची भावना असली की आपलं वेगळेपण राखता येतं...

घडणाऱ्या घटना, आजूबाजूची माणसं, किंवा बाह्यपरिस्थिती, सोशल मीडियावर असलेली विषवल्ली कशीही असली तरी आपण बाह्य जग बदलू शकत नाही. पण आपण स्वत:ला तर बदलू शकतो ना... !!!

सकारात्मक विचारांनी तुमचं तेजोवलाय नुसतं शुद्धच होत नाही, तर ते अधिकाधिक बळकट होत रहातं आणि त्याला नैसर्गिक संरक्षण मिळत राहातं.  जरी समोरची व्यक्ती त्याच्या विचारातून, बोलण्यातून कितीही नकारात्मकता तुमच्यावर फेकत असली तरी, जर तुमचे विचारच सकारात्मक असतील तर, तुम्ही समोरच्याच्या नकारात्मकतेने प्रभावित होत नाही. ईश्वराने माणसाला विचार करण्याची फार मोठी शक्ती दिली आहे ज्याने तो आपल्या जीवनाचं शिल्पं हवं तसं घडवू शकतो. पण बहुतेक वेळा आपण ही शक्ती नकारात्मकते मधे वाया घालवतो. जास्तीत जास्त सकारत्मक व्हा, आपलं वेगळंपण जपा...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या