Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

लक्ष्मण वैराळ रचीत नाट्यभारुड बालविवाह नको गं बाई... सर्व गावकरी झाले मंत्रमुग्ध



स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांसह गावकर्यांनी घेतली बालविवाह विरोधात शपथ

आपला ई पेपर | सिरसाळा|


 

बीड जिल्ह्यातील बालविवाहचे प्रमाण बघता चिंतेचा विषय झाला आहे.अनेक ठिकाणी बालविवाह होत असतांना प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.यावर प्रशासनाने कार्यवाही केल्या पंरतु बीड जिल्हा प्रशासनाच्या कार्यवाहीने नाही तर स्वंय प्रेरणेने बालविवाह मुक्त झाला पाहिजे अशी संकल्पना कर्तबगार जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी मांडली,ह्या संकल्पनेने साथ देत सिरसाळ्यात स्वातंत्र्य दिनी जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी बालविवाह विरोधात शपथ घेत पथनाट्य,भारुड, फलके,घोषणा,देत गावभर रॅली द्वारे जन जागृती केली. 


विशेष म्हणजे स.शिक्षक लक्ष्मण वैराळ रचीत नाट्यभारुड बालविवाह नको गं बाई....यांनी सर्वांचे लक्ष वेधले.


रॅलीत फलक दर्शवत बालविवाह कायदे बाबत जागृती केली.


मातीतून सोने पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ 'धरतीचे आम्ही लेकरे हे शेतकरी नृत्य सादर केले.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ह्या आयोजनास मार्गदर्शन शिक्षिका सौ.लता वाघमारे/चोपडे, मनीषा सरवदे,कल्पना मुंडेयांनी केले.


ह्या ठिकाणी उत्साहात ध्वजारोहण सिरसाळ्यात अनेक शासकीय/निमशासकीय अस्थापना आहेत. सर्वात प्रथम सिरसाळा पोलीस स्टेशन,जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा,सेवा सरकारी सोसायटी,ग्रामपंचायत कार्यालय सिरसाळा,न्यू हायस्कूल, लिटल प्रायमरी स्कूल,अर्जुनेश्वर विद्यालय, प्रेरणा महिला महाविद्यालय, देवगिरी ग्लोबल ॲकॅडमी, महाराष्ट्र ग्रामीण बॅंक,अहिल्याबाई होळकर विद्यालय,सौ.मालनबाई देशमुख महाविद्यालय, श्री.पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालय, यश पब्लिक स्कूल यासह अन्य ठिकाणी स्वतंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या