Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांनी वाचन कक्षा वाढवावी- पो.नि सलीम चाऊस


फाउंडेशन स्कूलमध्ये अधिकार प्रदान समारंभ|

आपला ई पेपर | परळी प्रतिनिधी

परळी येथील फाउंडेशन स्कूल येथे दि.15 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना अधिकार प्रदान समारंभमोठ्या उत्साहात पार पडला. 

या समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून संभाजीनगर पोलीस स्टेशन परळीचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस व पत्रकार इंजि.भगवान साकसमुद्रे लाभले होते. श्री चिंतामणी एज्युकेशन ट्रस्ट संचलित फाउंडेशन स्कूलचे अध्यक्ष विजय प्रकाश तोतला यांनी विद्यार्थ्यांमध्ये अश्या उपक्रमातून नेतृत्व गुण वृध्दींगत होतो.

यावेळी मार्गदर्शन करताना चाऊस म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अँड्रॉइड मोबाईलचा वापर टाळावा व त्या ऐवजी वेगवेगळी पुस्तके वाचून आपली वाचन कक्षा रुंदवावी. तसेच आपले शरीर बळकट करण्यासाठी मैदानी खेळ खेळावेत असेही ते म्हणाले.

या उपक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष रविकुमार तोतला व शैक्षणिक संचालिका सौ.रितू तोतला मॅडम यांचेही मार्गदर्शन लाभले. माध्यमिक प्राचार्य सुरेश नायर व प्राथमिक प्राचार्य गजानन नागझरे यांनी हा उपक्रम सहकाऱ्यांच्या मदतीने यशस्वी रित्या पार पडला. यावेळी पो.कॉ.भगवान चव्हाण, पो.कॉ.शंकर डोंगळे, शिक्षक,पालक विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या