श्री संत भगवानबाबा विद्यालयात ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांच्या हस्ते ध्वजारोहण
आपला ई पेपर |परळी प्रतिनिधी
मराठवाड्यातील अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून ओळख असलेल्या श्री संत भगवानबाबा शिक्षण संस्थेच्या पांगरी येथील श्री संत भगवानबाबा विद्यालयात ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. प्रथम ध्वजारोहण प्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
पांगरी येथील श्री भगवानबाबा विद्यालय ही मराठवाड्यातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणून ओळखल्या जाते. ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांनी १९९१ साली या संस्थेची स्थापना केली. पांगरी, लिंबुटा आदी गावांसह शेजारील गावांतील गोरगरीब, कष्टकरी, ऊसतोड मजुरांच्या मला मुलींच्या शिक्षणाची या संस्थेमुळे सोय झाली. इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ च्या बोर्डाचा निकाल दरवर्षी शंभर टक्के लागतो. या शाळेतील दर्जेदार शिक्षण घेऊन शेकडो विद्यार्थी अधिकारी झाले आहेत असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष फुलचंद कराड यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त बोलतांना सांगितले. ध्वजारोहण प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कवायती आणि देशभक्ती जागविणारी उत्साहपूर्ण भाषणे केली. यावेळी लिंबूटा गावच्या सरपंच सौ देवशाला बनसोडे ताई व उपसरपंच श्री अरुण मुंडे, रवि कराड तसेच ग्रामपंचायत सदस्य गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री कोपनर सरांनी केले कार्यक्रमासाठी शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री घुले सर उपस्थित होते आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चव्हाण यांनी केले.



Social Plugin