Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीकरांचे आभार...अनाथ व गरजूवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतचे हात

 आपला ई पेपर |परळी प्रतिनिधी


भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने, परळी शहरात अनाथ व गरजवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य साठी सामाजिक गरज म्हणून दानपेटी चालू करण्यात आली. या दानपेटीत परळी शहरातील अनेक युवक, महिला मंडळ ज्येष्ठ थोर मंडळीने दानपेटीत घडेल तसे दान केले केले.


परळी न.प चे स्वच्छता व आरोग्य सभापती अन्वर भाई मिस्कीन, पोलखोल या वृत्तपत्राचे मुख्य संपादक, भगीरथ बद्दर, माजी नगरसेवक महेंद्र रोडे आदींनीही  मदत केली.

या सामाजिक उपक्रमांमध्ये, प्राध्यापक लक्ष्मण गरड , सामाजिक कार्यकर्ते नागेश व्हावळे, सुरेश रायभोळे, चंद्रकांत लांडगे, युवा नेते महेश बचुटे, नितीन खलते, विश्वजीत कांबळे , आदी मान्यवरांनी परिश्रम घेतले.

यापुढेही हा उपक्रम असाच चालू राहील,परळी शहरातील शंकर पार्वती नगर या भागात असलेल्या आश्रम शाळेमध्ये आज तेथील अनाथ व गरजवंत विद्यार्थ्यांना , एक वही एक पेन प्रत्येकाला देण्यात आले या कार्यक्रमासाठी परळी नगरपरिषदचे स्वच्छता व आरोग्य सभापती अन्वर भाई मिस्कीन, तेयसीम भाई, प्राध्यापक लक्ष्मण गरड, इमरान भाई, महेश बचुटे, नितीन खलते, विश्वजीत कांबळे व आश्रम शाळेतील सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते. या उपक्रमाद्वारे अनेक गरजूवंत व अनाथ मुलांना वर्षभरातून अनेक गरजा पुरवल्या जाणार आहेत त्यामुळे ज्यांना स्वेच्छेने मदत करायचे आहे. त्यांनी संपर्क करावा असे आवहन विश्वजीत कांबळे यांनी केले आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या